नवी दिल्ली : बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी समर ऑफर (Summer Offer) आणली आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे. 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी समर ऑफर आली आहे. मात्र ही नवीन ऑफर नाही. बीएसएनएल 2399 रुपयांच्या प्लॅनसह अनेक दिवसांपासून अतिरिक्त वैधता ऑफर करत आहे. यामध्ये यूजरला अनेक फायदे मिळत आहेत. ज्यांना वर्षभरासाठी रिचार्ज करायला आवडते त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम ऑफर आहे.
बीएसएनएल आपला 2399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन समर ऑफर अंतर्गत देत आहे. या प्लॅनसह युजर्सना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय युजर्सना कंपनीकडून कॉलर ट्यून सेवा आणि इरॉस नाऊचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. साधारणपणे हा प्लॅन 365 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो. पण उन्हाळी ऑफर अंतर्गत, युजर्सना 60 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. याचा अर्थ असा आहे की या प्लॅनसह युजर्सना कंपनीकडून एकूण 425 दिवसांची सेवा मिळेल.
हाय-स्पीड डेटा असलेल्यांसाठी सर्वोत्तम नाहीज्यांना हाय-स्पीड डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन नाही. बीएसएनएलकडे 4G नेटवर्क नाही आणि याचा अर्थ असा की जर तुम्हाला दररोज 2 GB पेक्षा जास्त डेटा मिळत असेल, तुमच्याकडे इंटरनेटचा स्पीड चांगला नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मात्र, हा प्लॅन अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे, ज्यांचे 3G स्पीडवर देखिल काम चालते.
बीएसएनएलची 4G सेवा लवकरच येणार बीएसएनएलकडून जास्त अवधीचे प्लॅन ऑफर केले जात आहेत. बीएसएनएल प्रत्येक नियमित अंतराने आपल्या युजर्ससाठी अशा अतिरिक्त वैधता ऑफर आणते. सरकारी कंपनी सध्या भारतात 4G नेटवर्क आणण्यावर काम करत आहे. 4G नेटवर्कच्या समर्थनामुळे या योजना अधिक मौल्यवान बनतील.