Lokmat Money > बिझनेस न्यूज > BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर

BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सज्ज झाली आहे. जिओ प्रमाणे बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांना फ्री वॉइस कॉलिंग देण्याचा निर्णय

By admin | Published: September 22, 2016 03:03 PM2016-09-22T15:03:58+5:302016-09-22T15:49:27+5:30

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सज्ज झाली आहे. जिओ प्रमाणे बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांना फ्री वॉइस कॉलिंग देण्याचा निर्णय

BSNL will offer free voice service - 'Zio' will be given a collision | BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर

BSNL पण देणार फ्री व्हॉइस सेवा - 'जिओ'ला देणार टक्कर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.22- रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सज्ज झाली आहे. जिओ प्रमाणे बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांना फ्री वॉइस कॉलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एका अधिका-याने याबाबत माहिती दिली.
विशेष म्हणजे जिओची ऑफर फक्त 4G ग्राहकांसाठी आहे तर बीएसएनएल 2G आणि 3G ग्राहकांसाठी फ्री कॉलिंगची ऑफर घेऊन येणार आहे. देशात  2G आणि 3G च्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे बीएसएनएल 4G पेक्षा  2G आणि 3G ग्राहकांवर लक्ष्य केंद्रित करत आहे.
लाइफटाइम फ्री ऑफर 
बीएसएनएलची ही ऑफर रिलायन्स जिओपेक्षा स्वस्त असणार आहे. जिओच्या सगळ्यात स्वस्तातल्या प्लॅनसाठी 149 रूपये खर्च करावे लागतात. बीएसएनएलचा प्लॅन त्याहून स्वस्त असणार आहे. जिओ ठरावीक कालावधीसाठी फ्री ऑफर देत आहे, तर बीएसएनएल लाइफटाइम फ्री ऑफर देणार आहे.
मात्र, यासाठी ग्राहकांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून बीएसएनएल ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. मुंबई आणि दिल्ली वगळता इतर शहरांतील टेलिकॉम मार्केट्समध्ये बीएसएनएलची चांगली पकड आहे. त्यामुळे एअरटेल, वोडाफोन आणि आयडियासारख्या कंपन्यांवर आता आणखी दबाव वाढणार आहे.
ज्यांच्याघरी बीएसएनएलचं ब्रॉडबॅंड कनेक्शन आहे त्या ग्राहकांसाठी हा प्लॅन असणार आहे. म्हणजे मोबाइल कॉल्स हे लॅंडलाइन नेटवर्कद्वारे जोडले जातील, मात्र,ग्राहक घराबाहेर असतील तरीही कॉलिंग फ्रीच असणार आहे.

Web Title: BSNL will offer free voice service - 'Zio' will be given a collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.