BSNL कंपनीने ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. BSNL ने आता जास्त शहरांसाठी 777 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. बीएसएनएल भारत फायबरने 2020 मध्ये ग्राहकांसाठी 777 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन लॉन्च केला होता. पण त्यावेळी ही योजना अंदमान, निकोबार आणि गुजरात सर्कलसह काही मंडळांपुरती मर्यादित होती. हा प्लॅन आता जास्त मंडळांसाठी उपलब्ध होणार आहे. हा प्लॅन BSNL भारत फायबर, BSNL ची फायबर-टू-द-होम सेवा शाखा द्वारे ऑफर केला जातो. यापूर्वी या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसच्या स्पीडसह 500 जीबी डेटा उपलब्ध होता, पण आता कंपनीने यामध्ये उपलब्ध फायदेही अपडेट केले आहेत.
EPFO देतंय ७ लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर, जाणून घ्या या नव्या स्कीमचे फायदे
आता, बीएसएनएलचा 777 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन 100 Mbps स्पीड आणि 1500GB डेटासह येतो. याचा अर्थ कंपनीने डेटा लिमिट वाढवली आहे. 1500GB डेटा कोटा संपल्यानंतरही, तुम्ही 5 Mbps स्पीडने इंटरनेट वापरणे सुरू ठेवू शकता. या प्लॅनमध्ये कोणताही OTT प्लॅटफॉर्म मिळणार नाही. इतर प्लॅन्सप्रमाणे, रु. 777 ब्रॉडबँड प्लॅन देखील ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसाठी विनामूल्य लँडलाइन कनेक्शन देते.
या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्म मिळणार?
BSNL कडे इतर 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅन देखील आहेत,ज्या तुम्ही खरेदी करू शकता. या प्लॅनची किंमत 799 रुपये आणि 849 रुपये आहे. 799 रुपयांचा प्लॅन 1000GB पर्यंत डेटासह येते आणि Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 आणि YuppTV सारखे OTT ऑफर करते. तर 849 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps पर्यंत स्पीड आणि 3.3TB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये कोणताही OTT प्लॅटफॉर्म नाही. डेटा कोटा संपल्यानंतर, स्पीड इतर 100 एमबीपीएस प्लॅनप्रमाणे 5 Mbps ऐवजी 10 Mbps पर्यंत घसरतो.
सध्या, बीएसएनएल फायबर कनेक्शनसाठी ग्राहकांकडून कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क आकारत नाही. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत 500 रुपयांचे इन्स्टॉलेशन शुल्क माफ करण्यात आले आहे.