Join us  

बीएसएनएलची बंपर ऑफर! 249 रुपयांत दररोज 10 जीबी डेटा

By admin | Published: April 03, 2017 10:17 PM

मुकेश अंबानींनी आणलेल्या जियोने मोफत सेवा पुरवत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आपल्याकडे वळवले आहे. त्यामुळे धाबे दणाणलेल्या टेलिकॉम कंपन्यांनी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 -  मुकेश अंबानींनी आणलेल्या जियोने मोफत सेवा पुरवत मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आपल्याकडे वळवले आहे. त्यामुळे  धाबे दणाणलेल्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले ग्राहक टिकवण्यासाठी  दरात कपात करण्यास  सुरुवात केली आहे. आता सार्वजनिक  क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या बीएसएनएलनेही बंपर ऑफर आणली असून, बीएसएनएल 249 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 10 जीबी डेटा देणार आहे.  
   रिलायन्स जियो आल्यानंतर जवळपास सर्वच  टेलिकॉम कंपन्यांची आपल्या दरात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. दरम्यान, आज बीएसएनएलने घोषणा केलेल्या नव्या ऑफरनुसार ग्राहकांना 240 रुपयांच्या रिचार्जवर 10 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच रात्री 9 ते सकाळी 7 या काळात बीएसएनएलवरून व्हाइस कॉलही फ्री असतील. 
 बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार बीएसएनएल या ऑफरसाठी 2Mbps एवढा डेटा स्पीड देणार आहे. याचा अर्थ इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा स्पीड कमी देणार आहे. पण हा प्लॅन इतर कंपन्यांच्या मनाने बऱ्यापैकी स्वस्त असून, त्यातून डेटाही अधिक मिळणार आहे. 
31 मार्चला जियोची हॅपी न्यू इयर ऑफर संपल्यानंतर जियोने आपल्या ग्राहकांसाठी समर सर्प्राइझ प्लॅनची घोषणा केली होती.. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांना जियोला टक्कर देण्यासाठी अधिकाधिक आकर्षक प्लॅन आणावे लागत आहेत.