Join us

BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन; २ रूपयांपेक्षाही कमी खर्चात १ जीबी डेटा; Jio, Airtel चे प्लॅन यासमोर फेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 2:59 PM

सध्या टेलिकॉम कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणत आहेत नवनवीन प्लॅन्स. Reliance Jio, Vodafone-Idea, Airtel, BSNL सारख्या कंपन्यांनी आणलेत आकर्षक प्लॅन्स.

ठळक मुद्देसध्या टेलिकॉम कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणत आहेत नवनवीन प्लॅन्स.Reliance Jio, Vodafone-Idea, Airtel, BSNL सारख्या कंपन्यांनी आणलेत आकर्षक प्लॅन्स.

रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडियासारख्या (Vodafone-Idea) कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलही जबरदस्त प्लॅन्स लाँच करत आहे. आज आपण असा एक प्लॅन जाणून घेऊया ज्यामध्ये ग्राहकांना २ रूपयांपेक्षाही कमी किंमतीत १ जीबी डेटा मिळत आहे. तर दुसरीकडे एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओसारख्या कंपन्या यापेक्षा थोड्या अधिक किंमतीत १ जीबी डेटा देत आहेत. दरम्यान, हे एक स्टँडअलोन व्हाऊचर नाही, जे १.४२ रूपयांत खरेदी केलं जाऊ शकतं. बीएसएनएलचा हा प्लॅन सर्वात कमी किंमतीत १ जीबी डेटा उपलब्ध करून देत आहे. 

BSNL युझर्सना ५९९ रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये सर्वात स्वस्त १ जीबी डेटा देण्यात येत आहे, या प्लॅनचं नाव 'STV_WFH_599' असं आहे. यामध्ये ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि दररोज ५ जीबी डेटा देण्यात येतो. अन्य कोणतीही कंपनी ८४ दिवसांच्या प्लॅनमध्ये इतका डेटा देत नाही. या प्लॅनसोबत मिळणाऱ्या डेटानुसार ग्राहकांना प्रत्येक जीबीसाठी केवळ १.४२ रूपयांचा खर्च येतो. यासोबतच ग्राहकांना Zing चं फ्री बेनिफिटही देण्यात येतं. 

जर तुम्हाला हा डेटा कमी पडत असेल तर तुम्ही २५१ रूपयांमध्ये अॅड ऑन डेटा व्हाऊचरही खरेदी करू शकता. या व्हाऊचरचं नाव 'DATA_WFH_251' आहे. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच या प्लॅनसोबत ७०जीबी डेटा आणि झिंगचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. फक्त इतर कंपन्यांच्या तुलनेत सध्या बीएसएनएलकडे पॅन इंडिया ४जी सेवा नाही.

टॅग्स :बीएसएनएलरिलायन्स जिओएअरटेलव्होडाफोनआयडियाइंटरनेट