Join us

BSNL चा जबरदस्त Prepaid Plan; कमी किंमतीत वर्षभर रोज २ जीबी डेटा, OTT सबस्क्रिप्शन्स, अन्य फायदेही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 7:39 PM

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ही असे दोन प्लॅन्स ऑफर करत आहे, ज्यामध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी मिळणार आहे.

सध्या Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea, Bsnl सारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांना टिकवण्यासाठी तसंच नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स लाँच करत आहेत. बीएसएनएल ही कंपनीही खासगी कंपन्यांना चांगलीच टक्कर देत आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स ऑफर कर आहेत. याची किंमत कमी असली तरी यात मिळणारे बेनिफिट्सही अधिक आहेत.

बीएसएनएलचा एक प्लॅन १९९९  रूपयांचा असून यामध्ये ३६५ दिवसांची वैधता देण्यात येते. हा प्लॅन घेतल्यानंतर ग्राहकांना ३६५ दिवसांसाठी दररोज २ जीबी हायस्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससारख्या सुविधा देण्यात येतात. याशिवाय या प्ल२नमध्ये अनलिमिटेड साँग चेंजसह BSNL Tune चं सबस्क्रिप्शन, Eros Now आणि ६० दिवसांसाठी लॉकधुन कन्टेन्टही देण्यात येतं.

आणखी एक वार्षिक प्लॅनयापूर्वीच्या प्लॅनच्या तुलनेत बीएसएनएलचा हा प्लॅन थोडा महाग आहे. यामध्ये ग्राहकांना ४२५ दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनची किंमत २३९९ रूपये इतकी आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएस, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, तसंच दररोज ३ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येतो.

ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल सांगायचं झालं तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना Eros Now Entertainment चं सबस्क्रिप्शन, पर्सनलाईज्ड रिंगटोन आणि अनलिमिटेड साँग चेंजचा ऑप्शन देण्यात येतो. यामध्ये किंमतीच्या तुलनेने मिळणारे बेनेफिट्स हे अधिक आहेत.

टॅग्स :बीएसएनएलएअरटेलव्होडाफोनआयडिया