Join us

Budget 2018 : आपला इन्कम टॅक्स मोजायचाय?... हे आहे सोप्पं गणित!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:42 AM

आपल्या ढोबळ वार्षिक उत्पन्नावर (ग्रॉस) आयकर ठरत नाही, तर तो निव्वळ उत्पन्नावर ठरतो. तो कसा मोजायचा याबद्दल अनेकांच्या मनात शंका, संभ्रम असतो.

नवी दिल्लीः अर्थसंकल्पाचे वारे वाहू लागल्यापासून टॅक्स स्लॅब, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा याची चर्चा नोकरदारांमध्ये ऐकू येतेय. वार्षिक उत्पन्नावर आपल्याला किती कर द्यावा लागणार, हे दरवर्षी अर्थसंकल्पातून ठरत असल्यानं टॅक्स स्लॅबकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. अर्थात, आपल्या ढोबळ वार्षिक उत्पन्नावर (ग्रॉस) आयकर ठरत नाही, तर तो निव्वळ उत्पन्नावर ठरतो. त्याबद्दल अनेकांच्या मनात शंका, संभ्रम असतो. त्यामुळे इन्कम टॅक्स कसा मोजायचा, हे जाणून घेऊया. 

सध्याचे टॅक्स स्लॅब 

>> अडीच लाख रुपयांपर्यंत कुठलाही कर नाही. >> अडीच ते पाच लाख रुपये - 5 टक्के कर>> पाच ते 10 लाख रुपये - 20 टक्के कर>> 10 लाख रुपये आणि त्याहून अधिक - 30 टक्के कर

ढोबळ वेतन (ग्रॉस सॅलरी) म्हणजे काय?

बेसिक पे + एचआरए + टीए + डीए + विशेष भत्ते + अन्य भत्ते + लिव्ह एन्कॅशमेंट + ग्रॅच्युइटी = ग्रॉस सॅलरी

करपात्र उत्पन्न कसं ठरतं?

ढोबळ वेतनातून काही गोष्टी, विशिष्ट रक्कम वजा केल्यानंतर आपल्याला नेमका किती उत्पन्नावर कर भरायचा आहे, हे निश्चित होतं. >> एचआरए + महानगरांमध्ये राहणाऱ्या नोकरदारांचे 50 टक्के आणि अन्यत्र राहणाऱ्या नोकरदारांचे 40 टक्के बेसिक वेतन करमुक्त असते.  >> एलटीएची बिलं सादर केल्यास त्या रकमेवरही कर भरावा लागत नाही. >> सेक्शन 80 सी ते 80 यू अंतर्गत जीवनविमा, शैक्षणिक शुल्क, पीपीएफ, फिक्स डिपॉझिट यासारखी गुंतवणूक करमुक्त असते.>> सुटीच्या दिवशी काम केल्याचं मिळणाऱ्या वेतनावर कर लागत नाही. >> गृहकर्जाच्या व्याजावर आयकरात सवलत मिळते. >> प्रोफेशनल टॅक्सही आपल्या ग्रॉस सॅलरीमधून वजा केला जातो.>> एन्टरटेन्मेंट अलाउन्स या सदराखाली येणारा वेतनाचा भागही करमुक्त असतो. 

आता मोजा आयकर!

वरील सर्व गोष्टी वजा केल्यानंतर आपण कुठल्या स्लॅबमध्ये येतो, हे तुम्हाला कळेल. त्यानुसार, त्या स्लॅबसाठी ठरवून देण्यात आलेला कर अधिक 3 टक्के सेस इतका आयकर आपण सरकारला देणं लागतो. उदाहरणार्थ, आपण पाच ते 10 लाख रुपये उत्पन्नाच्या श्रेणीत येत असाल तर 20 टक्के आयकर + 3 टक्के सेस असा 23 टक्के कर आपल्याला भरावा लागेल. 

दरम्यान, हे टॅक्स स्लॅब गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पावेळी ठरवण्यात आलेत. त्यात यंदा बदल होण्याची शक्यता आहे. 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा सरकारचा विचार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे टॅक्स स्लॅबमध्येही अर्थमंत्री काही बदल करतात का आणि काही करसवलत देतात का, हेही पाहावं लागेल.

टॅग्स :अर्थसंकल्प २०१८इन्कम टॅक्सआयकर मर्यादा