नवी दिल्ली : चार वर्षांत कंपनी कर घटवून २५ टक्के करण्यात येईल, अशी घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २0१५मधील आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार तो यंदाच्या अर्थसंकल्पात २५ टक्के होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण जगात कंपनी कर कमी करण्यात येत आहे. अमेरिकेने अलीकडेच हा कर ३५ टक्क्यांवरून २१ टक्के केला. ब्रिटनने २0२0पर्यंत तो
१९ टक्क्यांवरून १७ टक्के करण्याचे प्रस्तावित केले आहे. स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया पुढाकारासाठी स्थिर आणि कमी कंपनी कर असणे आवश्यक आहे.
सरकारने दिलेली वचने आणि त्यांची प्रत्यक्षातील स्थिती
वचन १ : २0१९पर्यंत कंपनी कर २५ टक्के करण्यात येईल.
स्थिती :
१) पाच कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी कर २९ टक्के केला आहे.
२) २0१६नंतर स्थापन झालेल्या कंपन्यांसाठी पुढील पर्याय आहेत:
अ) नियमित कर कपातीसह
३0 टक्के कर द्या.
ब) कर कपातीशिवाय २५ टक्के कर द्या.
३) कर सवलती रद्द करण्याची सुरुवात २0१६-१७पासून झाली आहे.
वचन २ : लाभांश वितरण कर (डीडीटी) रद्द करणार.
स्थिती :
१) डीडीटी १६.९९५ टक्क्यांवरून २0.५३८ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे लाभांश वितरणासाठी उपलब्ध असलेल्या निधीत घट झाली आहे.
वचन ३ : किमान पर्यायी कर (एमएटी) रद्द करणार.
स्थिती :
१) १0 कोटींपेक्षा जास्त नफा कमावणाºया कंपन्यांचा सर्वोच्च एमएटी कर २१.३४ टक्के आहे.
२) २0१७च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी एमएटी रद्द केला जाणार नसल्याचे जाहीर केले.
वचन ४ : स्टार्टअप आणि मेक इन इंडिया पुढाकारांना गती देणार.
स्थिती :
१) ५0 टक्क्यांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या छोट्या उद्योगांचा कंपनी कर कमी करून २५ टक्के केला.
२) वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून भांडवल घेणाºया असूचीबद्ध कंपनीला एंजेल टॅक्स लागू. औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने मंजुरी दिलेल्या स्टार्टअप कंपन्यांनाच एंजेल टॅक्समधून सवलत.
budget 2018 : कंपनी कर २५ टक्क्यांवर येणार का?
चार वर्षांत कंपनी कर घटवून २५ टक्के करण्यात येईल, अशी घोषणा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी २0१५मधील आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार तो यंदाच्या अर्थसंकल्पात २५ टक्के होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:57 AM2018-02-01T00:57:26+5:302018-02-01T00:58:28+5:30