नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे.
जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला 75 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा सर्व खर्च केंद्र सरकार करण्यार आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.
Budget 2019 Latest News & Live Updates