नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी सोने-चांदीवरील सीमा शुल्क 10 टक्क्यांवरुन वाढवून 12.5 टक्के करण्यात आलं आहे. तर पेट्रोल-डिझेल लीटरमागे 1 रुपया अतिरिक्त कर आकारण्यात येणार असल्याने सोने खरेदी आणि पेट्रोल-डिझेल महाग होणार आहे. तसेच तंबाखूवरही अतिरिक्त कर आकारण्यात येणार आहे.
तसेच मोदी सरकारने बड्या नोकरदारांना जितकी कमाई कराल तितका टॅक्स वाढविण्यात आला आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त टॅक्स आकारण्यात येणार आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. तर सामान्य नोकरदारांना दिलासा मिळालं आहे.
5 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे तसेच इलेक्ट्रिक कार खरेदीवर आयकरात दीड लाखांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. तसेच 45 लाखापर्यंतचं घर खरेदीवर दीड लाखाची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
तसेच एका वर्षात एक कोटींपेक्षा जास्त कॅश बँकेतून काढल्यास त्यावर 2 टक्के टीडीएस लागणार आहे, कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आरबीआयचं नियंत्रण राहणार आहे. नियमितपणे कर देऊन देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे आभार आहोत. 20 रुपयांची नवी नाणी लवकर चलनात आणली जाणार आहे. या नवीन नाण्यामुळे अंध लोकांनाही नाणी ओळखता येणार आहे. गेल्या 5 वर्षात प्रत्यक्ष करात सरकारच्या नीतीमुळे वाढ झाली. 250 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्के होता, आता या स्लॅबमध्ये 400 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांचाही समावेश करण्यात येत आहे. यामध्ये 99.3 टक्के कंपन्यांचा समावेश आहे.
ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिलं जाईल, 180 दिवसांसाठी थांबावं लागतं हा नियम आहे, पण आता त्याची गरज नाही. जिथे भारताचे राजदूत नाहीत, तिथे दुतावास सुरु केले जातील, 2018 मध्ये आफ्रिका खंडातील 18 देशांमध्ये दुतावास उघडण्यात आले आहेत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली