केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज जाहीर केलेला अर्थसंकल्प अंतरिम नव्हे, तर 'निवडणूक विशेष' ठरला. शेतकरी, कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी मोदी सरकारनं अनेक घोषणा केल्या. त्यातील, आपले पैसे वाचवणारे काही महत्त्वाचे निर्णय....
>> ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर नाही. ही मर्यादा अडीच लाख होती, ती थेट दुपटीने वाढवली.
>> ८० सी अंतर्गत १.५० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास ५ लाख + १.५० लाख मिळून साडे सहा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल.
>> व्याजावरील करकपातीची मर्यादा १० हजारांवरून ४० हजारांवर. बँका-पोस्टातील ठेवींवरचं ४० हजार रुपयांपर्यंत व्याज करमुक्त.
>> स्टँडर्ड डीडक्शन ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर.
>> रेंटल इन्कम (एचआरए) २,४०,००० रुपयांहून अधिक असेल तरच टीडीएस कापला जाणार. याआधी ही मर्यादा १,८०,००० रुपये होती.
>> 'सेकंड होम'वर कर नाही.
>>२० लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युईटीवर कर नाही.
>> २१ हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा. 10 कोटी असंघटीत कामगारांना मिळणार लाभ.
>> प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाः १५ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देणार
Budget 2019 Latest News & Live Updates