Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2019 : देशाचा अर्थसंकल्प एका क्लिकवर

Budget 2019 : देशाचा अर्थसंकल्प एका क्लिकवर

Budget 2019 : जाणून घ्या केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेला अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 04:17 PM2019-02-01T16:17:05+5:302019-02-01T17:27:59+5:30

Budget 2019 : जाणून घ्या केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेला अर्थसंकल्प

Budget 2019 : key highlights of interim budget of narendra modi government | Budget 2019 : देशाचा अर्थसंकल्प एका क्लिकवर

Budget 2019 : देशाचा अर्थसंकल्प एका क्लिकवर

पुढच्या एक-दोन महिन्यांत देश निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्याआधीचा शेवटचा अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सादर केला. खरं तर, हे अंतरिम बजेट होतं. पण, केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार, मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून एकप्रकारे निवडणुकीसाठी मतांची पेरणीच केली आहे. या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे....

1. ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर नाही. ही मर्यादा अडीच लाख होती, ती थेट दुपटीने वाढवली.
2. ८० सी अंतर्गत १.५० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास ५ लाख + १.५० लाख मिळून साडे सहा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल.
3. पीएम किसान योजनेअंतर्गत छोट्या शेतकऱ्यांच्या (2 हेक्टरी जमिनीचे मालक) खात्यात प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये
4. २१ हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा. 10 कोटी असंघटीत कामगारांना मिळणार लाभ.
5. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाः १५ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देणार
6. रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद
7. संरक्षण क्षेत्रासाठी प्रथमच तब्बल 3 लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद  
8. २० लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युईटीवर कर नाही.

Budget 2019 Latest News & Live Updates




9. मनरेगासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात 60 हजार कोटी रुपये दिले जाणार
10. व्याजावरील करकपातीची मर्यादा १० हजारांवरून ४० हजारांवर. बँका-पोस्टातील ठेवींवरचं ४० हजार रुपयांपर्यंत व्याज करमुक्त.
11. 'सेकंड होम'वर कर नाही. 
12. पशूपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे 2 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणार
13. येत्या 5 वर्षांत 1 लाख डिजिटल गावांची निर्मिती करू - गोयल 
14. रेंटल इन्कम (एचआरए) २,४०,००० रुपयांहून अधिक असेल तरच टीडीएस कापला जाणार. याआधी ही मर्यादा १,८०,००० रुपये होती. 

15.वन रॅन्क वन पेन्शनद्वारे सरकारने गेल्या आर्थिक वर्षात जवानांना 35 हजार कोटी रुपये दिले
16.ग्रामीण कुटुंबांना 8 कोटी मोफत LPG कनेक्शन पुरवण्याची योजना




17. स्टँडर्ड डीडक्शन ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपयांवर. 
18. आयुषमान योजनेमुळे गरिबांचे 3 हजार कोटी रुपये वाचले
19. सौभाग्य योजनेतून घराघरात वीजजोडणी, मार्च 2019 पर्यंत देशातील सर्व घरांमध्ये वीज उपलब्ध करुन दिली जाणार
20.2020 पर्यंत प्रत्येकाला घर आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार  
21. महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्यापेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असता


 

Web Title: Budget 2019 : key highlights of interim budget of narendra modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.