पुढच्या एक-दोन महिन्यांत देश निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्याआधीचा शेवटचा अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सादर केला. खरं तर, हे अंतरिम बजेट होतं. पण, केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अंतरिम अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, नोकरदार, मध्यमवर्गीयांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडून एकप्रकारे निवडणुकीसाठी मतांची पेरणीच केली आहे. या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे....
1. ५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर नाही. ही मर्यादा अडीच लाख होती, ती थेट दुपटीने वाढवली.2. ८० सी अंतर्गत १.५० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास ५ लाख + १.५० लाख मिळून साडे सहा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल.3. पीएम किसान योजनेअंतर्गत छोट्या शेतकऱ्यांच्या (2 हेक्टरी जमिनीचे मालक) खात्यात प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये4. २१ हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा. 10 कोटी असंघटीत कामगारांना मिळणार लाभ.5. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाः १५ हजार रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देणार6. रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद7. संरक्षण क्षेत्रासाठी प्रथमच तब्बल 3 लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद 8. २० लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युईटीवर कर नाही.
Budget 2019 Latest News & Live Updates
15.वन रॅन्क वन पेन्शनद्वारे सरकारने गेल्या आर्थिक वर्षात जवानांना 35 हजार कोटी रुपये दिले16.ग्रामीण कुटुंबांना 8 कोटी मोफत LPG कनेक्शन पुरवण्याची योजना