Join us

Budget 2019 Live Updates: टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 10:09 AM

नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प 2019 आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभेत ...

05 Jul, 19 01:09 PM

सोने,चांदी, पेट्रोल-डिझेल महागणार

सोने-चांदीच्या सीमाशुल्कात 2 टक्क्यांनी वाढ, सीमाशुल्कात वाढ केल्याने सोने-चांदी महागणार. पेट्रोल-डिझेलवर 1 रुपये अतिरिक्त कर आकारण्यात येणार. 



 

05 Jul, 19 01:06 PM

5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त



 

05 Jul, 19 01:05 PM

वर्षाला 1 कोटी बँकेतून काढले तर 2 लाखांचा टीडीएस कापणार

एका वर्षात एक कोटींपेक्षा जास्त कॅश बँकेतून काढल्यास त्यावर 2 टक्के टीडीएस लागणार, वार्षिक 2 ते 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांना 3 टक्के सरचार्ज लागणार तर 5 कोटी रुपयांपर्यंत जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के सरचार्ज लागणार 



 

05 Jul, 19 12:59 PM

मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारचा मोठा दिलासा

45 लाखांपर्यंत घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीड लाख रुपयांची सूट देण्यात येणार. तसेच गृह कर्जावरील व्याजदरात मिळणारी सूट 2 लाखांहून 3.5 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचसोबत इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे. 

05 Jul, 19 12:49 PM

इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून विशेष सूट

कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आरबीआयचं नियंत्रण राहणार. नियमितपणे कर देऊन देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रामाणिक करदात्यांचे आभार आहोत. 20 रुपयांची नवी नाणी लवकर चलनात आणली जाणार आहे. या नवीन नाण्यामुळे अंध लोकांनाही नाणी ओळखता येणार आहे. गेल्या 5 वर्षात प्रत्यक्ष करात सरकारच्या नीतीमुळे वाढ झाली. 250 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्के होता, आता या स्लॅबमध्ये 400 कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांचाही समावेश करण्यात येत आहे. यामध्ये 99.3 टक्के कंपन्यांचा समावेश आहे. ई-वाहने तयार करण्याचं आपल्याला जागतिक हब करण्यावर भर देत आहोत. या वाहनांवर 12 ऐवजी 5 टक्के जीएसटी लावला जाईल इलेक्ट्रीक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आयकरमध्ये सूट देण्यात येणार. 



 

05 Jul, 19 12:29 PM

मागील वर्षीपेक्षा यंदा 1 लाख कोटी एनपीएमध्ये घट

गेल्या 4 वर्षांत बुडीत खात्यात गेलेले 4 लाख कोटी रुपये परत बँकांना परत मिळाले. राष्ट्रीय बँकांना 70 हजार कोटींची मदत केली



 

05 Jul, 19 12:25 PM

NRI भारतीयांना 180 दिवसांत आधार कार्ड देणार

ज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिलं जाईल, 180 दिवसांसाठी थांबावं लागतं हा नियम आहे, पण आता त्याची गरज नाही



 

05 Jul, 19 12:22 PM

जिथे भारताचे राजदूत नाहीत, तिथे दुतावास सुरु करणार

जिथे भारताचे राजदूत नाहीत, तिथे दुतावास सुरु केले जातील, 2018 मध्ये आफ्रिका खंडातील 18 देशांमध्ये दुतावास उघडण्यात आले आहेत



 

05 Jul, 19 12:20 PM

शेअर बाजार 118 अंकांनी घसरला



 

05 Jul, 19 12:18 PM

'नारी तू नारायणी' महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा

अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार त्यांना 180 दिवस वाट बघावी लागणार नाही पासपोर्ट असलेल्यांना लगेच आधार कार्ड देणार, देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान, 'नारी तू नारायणी' महिलांच्या विकासासाठी मोदी सरकारचा नवा नारा आहे. महिलांच्या योगदानाशिवाय सामाजिक-आर्थिक विकास शक्य नाही, गेल्या दशकात महिलांचं योगदान वाढतंय, या निवडणुकीतही सर्वाधिक महिला मतदार होत्या



 

05 Jul, 19 12:06 PM

35 कोटी एलईडी बल्बचा पुरवठा करणार

प्रत्येक घरात वीज देण्यासाठी उजाला योजनेतंर्गत 35 कोटी एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात येतील. 18 हजार 340 कोटी रुपये वर्षाला एलईडी बल्बमुळे बचत केले जात आहेत. रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण करण्यासाठी यावर्षी एक मोठी योजना सुरु केली जाईल

05 Jul, 19 12:12 PM

भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न

राजघाटाला राष्ट्रीय स्वच्छता केंद्र बनविले जाणार. त्याचसोबत खेलो भारत योजना जाहीर करण्यात आली. ऑनलाइन कोर्सेसना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार. याच अंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी बोलविलं जाणार. भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार 

05 Jul, 19 12:06 PM

भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न

राजघाटाला राष्ट्रीय स्वच्छता केंद्र बनविले जाणार. त्याचसोबत खेलो भारत योजना जाहीर करण्यात आली. ऑनलाइन कोर्सेसना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार. याच अंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी बोलविलं जाणार. भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार 

05 Jul, 19 12:01 PM

परदेशी विद्यार्थ्यांसाठी Study In India कार्यक्रम सुरु करणार

पाच वर्षांपूर्वी जगातील 200 टॉप विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नव्हतं, आपण यावर काम केलं, आता आपल्या तीन संस्था यामध्ये आहेत. विदेशी मुलांना भारतात चांगले शिक्षण घेता यावं यासाठी स्टडी इन इंडिया आणणार. 

05 Jul, 19 11:58 AM

स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढविणार

स्वच्छ भारत अंतर्गत 9 कोटी 6 लाख शौचालय मागील पाच वर्षात बांधण्यात आली. जवळपास 5 लाख 6 हजार गावं हगणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनजमेंट प्रत्येक गावांमध्ये राबविणार 



 

05 Jul, 19 11:55 AM

शेतीच्या पायाभूत सुविधांवर भर देणार

पंतप्रधान ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियानांतर्गत दोन कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलंय, देशातील प्रत्येक पंचायतीला डिजीटल केलं जाईल, PPP तत्वावर काम केलं जाईल. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना --मत्स्य व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा मजबूत करणार. शेतीच्या पायाभूत सुविधांवर भर देणार. पुढील 5 वर्षात पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 1 लाख 25 हजार किमी रस्ते बांधणीचे लक्ष्य 



 

05 Jul, 19 11:43 AM

जलशक्ती या नव्या मंत्रालयाकडून पाण्याच्या नियोजनावर भर देणार

आरोग्यदायी समाजाअंतर्गत आयुष्मान भारत, सुपोषित महिला आणि मुलं तर नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. भाड्याने घरे घ्यायला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच आदर्श भाडे कायदा आणणार आहोत. अन्नदात्याला ऊर्जादाता करणार, कृषी आणि दूध उद्योगासाठी योजना आखणार. झिरो बजेट शेतीवर भर देणार. जलशक्ती या नवीन मंत्रालयातंर्गत हर घर जल ही योजना आणणार. प्रत्येकाला पिण्याचं पाणी देण्याची योजना आहे. पाण्याचं नियोजन करण्यासाठी देशभर जलशक्ती अभियान राबविणार आहोत. स्थानिक पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जातील. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीही प्रयत्न होतील

05 Jul, 19 11:51 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात



 

05 Jul, 19 11:43 AM

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी 95 लाख घरे बांधण्याचं उद्दिष्ट

2022 म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशातील प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी मिळेल, ज्यांना कनेक्शन घेण्याची इच्छा नाही त्यांना यातून वगळलं जाईल. आरोग्यदायी समाजाअंतर्गत आयुष्मान भारत, सुपोषित महिला आणि मुलं तर नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.सरकारी जमिनींवर स्वस्त घरांची योजना लागू करणार. गाव, गरिब आणि शेतकरी यांच्यावर आमचा लक्ष आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी 95 लाखं घरं बांधण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेत 1 लाख 2 हजार किमी रस्ते बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 

05 Jul, 19 11:35 AM

पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर; छोट्या व्यापाऱ्यांना होणार मिळणार पेन्शन

जलमार्ग वाढवण्यावर आमच्या सरकारचा भर, वन नेशन, वन ग्रिडसाठी ब्लुप्रिंट तयार, रेल्वेमध्ये खासगी भागेदारीलाही (PPP मॉडेल) प्रोत्साहन देणार आहोत. लघु, मध्यम उद्योगांना उभारी देण्यासाठी 350 कोटी रुपये देणार. किरकोळ व्यापारांसाठी पेन्शन योजन आणणार. तीन कोटी दुकानदारांना पेंशन देण्याचा विचार आहे. त्यासाठी पंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर केली



 

05 Jul, 19 11:28 AM

रेल्वेसाठी 50 लाख कोटी रुपयांची गरज - निर्मला सीतारामन

भारतमाला प्रकल्पांतर्गत रस्त्यांचा चांगला विकास होणार, यातून छोट्या शहरांना जोडणार, भारतमाला प्रकल्पाने व्यवसायवृद्धी होणार आहे. रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर बनवणार. रेल्वेसाठी 50 लाख कोटी रुपयांची गरज आहे



 

05 Jul, 19 11:24 AM

भारत आता रोजगार देणारा देश बनला आहे.

भारत आज रोजगार देणारा देश बनला आहे. आता पायाभूत सुविधा देण्यावर आमचा भर आहे. आम्ही 5 वर्षात 1 लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेत जोडले, पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर देणार आहोत. 



 

05 Jul, 19 11:22 AM

विकासामुळे ग्रामीण आणि शहर यातील दरी कमी झाली.

300 किमीच्या मेट्रो प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. आर्थिक विकास वाढविण्यावर भर दिला आहे. मेक इन इंडियामुळे विकासाला चालना मिळाली. गेल्या 5 वर्षात अनेक योजना आणल्या. ‘मजबूत देश के लिए, मजबूत नागरिक हेच आमचं लक्ष्य आहे. भारताकडे जगातील तिसर्‍या क्रमांकाचं देशांतर्गत हवाई वाहतुकीचे जाळे आहे. भारताने आता हवाई वाहतुकीच्या फायनान्सिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे. भारतामाला, सागरमाला, उडानमुळे शहर आणि ग्रामीण भागातील दरी कमी झाली. 



 

05 Jul, 19 11:15 AM

यकीन हो तो कोई रास्‍ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है



 

05 Jul, 19 11:14 AM

र्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणं हे उद्दिष्ट - निर्मला सीतारामन

भारतातील सर्व खासगी उद्योगांनी अर्थव्यवस्थेला वाढवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आमचं सरकार परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सूत्राने काम करतंय, आता नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरेल.  २.०७ ट्रिलियन डॉलर्सवर असलेली अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणं हे उद्दिष्ट आहे. 



 

05 Jul, 19 11:11 AM

देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो - निर्मला सीतारामन

गेल्या पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं, देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचं ध्येय गाठणार आहे. घर आणि शौचालयांची व्यवस्था करुन महिलांचा सन्मान वाढवला. आज भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर आहे. पाच वर्षांपूर्वी आपण ११व्या क्रमांकावर होतो. 



 

05 Jul, 19 11:07 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात



 

05 Jul, 19 10:45 AM

निर्मला सीतारामन यांचे आई-वडीलदेखील अर्थसंकल्प मांडताना असणार उपस्थित

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आई सावित्री सीतारामन आणि वडील नारायन सीतारामन संसदेत पोहचले. निर्मला सीतारामन या मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 



 

05 Jul, 19 10:35 AM

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या प्रती संसदेत दाखल, मंत्रिमंडळाची बैठकही सुरु



 

05 Jul, 19 10:12 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नवीन प्रथेला सुरुवात



 

05 Jul, 19 10:13 AM

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची परंपरेनुसार भेट घेतली. 



 

05 Jul, 19 10:15 AM

राष्ट्रपतींच्या भेटीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत पोहचल्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर संसदेत पोहचले 



 

05 Jul, 19 10:13 AM

नोकरदारांसाठी मोदी सरकार गिफ्ट देण्याची शक्यता



 

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019नरेंद्र मोदीनिर्मला सीतारामनसंसदअर्थसंकल्प 2019