Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:37 PM2019-02-01T13:37:11+5:302019-02-01T19:37:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. 

Budget 2019: modi government to launch kamdhenu scheme for cows | Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

Highlightsगो-संवर्धनासाठी कामधेनू योजनाराष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना करणारकामधेनू योजनेसाठी 750 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. 

गोरक्षण व संवर्धनासाठी आग्रही असलेल्या सत्ताधारी भाजपा सरकारने आपल्या अपेक्षेप्रमाणे यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत गो-संवर्धनासाठी सरकार राष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना करणार येणार आहे. यावेळी 'गो-संवर्धनासाठी आवश्यक असेल ते सर्वकाही केले जाईल,' असे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. तसेच, कामधेनू योजनेसाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Budget 2019 Latest News & Live Updates

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

  • असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार 
  • 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
  • पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत 
  • किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी 
  • सरकार कामधेनू योजना सुरू करणार 
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार 
  • दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार 
  • गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
  • यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
  • आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
  • एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं

Web Title: Budget 2019: modi government to launch kamdhenu scheme for cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.