नवी दिल्ली - वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लोकसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घोषणांचा पाऊस पाडला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. ''सर्व वर्गांना विचारात घेऊन आणि सर्वांना काही ना काही लाभ मिळेल, असा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. हा केवळ ट्रेलर आहे. निवडणुकीनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. तो देशाला विकासाच्या मार्गावरून नेणारा असेल,'' असे नरेंद्र मोदी म्हणाले.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधना नरेंद्र मोदी म्हणाले की, ''सर्व वर्गांना विचारात घेऊन आणि सर्वांना काही ना काही लाभ मिळेल, असा प्रयत्न अर्थसंकल्र्पातून करण्यात आला आहे. 12 कोटींपेक्षा जास्त शेतकरी, 3 कोटींहून अधिक मध्यमवर्गीय करदाते आणि 30 ते 40 कोटी श्रमिक यांना थेट लाभ होईल, असे निर्णय घेण्यात आले आहेत. ''
PM: For farmers, there have been several schemes by different govts from time to time, but only 2-3 crore farmers were included under these schemes. But now PM Kisan Samman Nidhi scheme will benefit over 12 crore farmers who own 5 acres or less than 5 acres of land. #Budget2019pic.twitter.com/EnAu6W50mv
— ANI (@ANI) February 1, 2019
''आता देशातील गरिबी वेगाने कमी होत आहे. तसेच मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. या मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षाना बळ मिळेल, यासाठी सरकारने कटिबद्धता दाखवली आहे,'' असे मोदींनी सांगितले.
PM: It's generosity&honesty of middle class&upper middle class which provides tax to the nation through which schemes are formulated&there is welfare of poor. There was always the demand to exempt those, with annual income upto Rs 5 Lakh, from taxation. Our govt fulfilled this. pic.twitter.com/e69OaBvNFI
— ANI (@ANI) February 1, 2019
पंतप्रधान सन्मान निधीचा लाभ पाच एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची चिंता याआधी कुणीच केली नाही. अशा वर्गाची लोकसंख्या 40 ते 42 कोटी आहे, अशा व्यक्तींसाठी श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले.
हा अर्थसंकल्प गरीबांना शक्ती देईल. शेतकऱ्यांना मजबुती देईल, कष्टकऱ्यांना सन्मान देईल, मध्यमवर्गीयांची स्वप्ने साकार करेल, प्रामाणिक करदात्यांचा गौरव करेल, व्यापाऱ्यांना सशक्त करेल. बांधकामाच्या निर्मितीला गती देईल. अर्थव्यवस्थेला नवी शक्ती देईल. देशाचा विश्वास मजबूत करेल. तसेच नवभारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशातील 130 कोटी नागरिकांना नवी ऊर्जा देईल, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.
Prime Minister Narendra Modi: From middle class to labourers, from farmers’ growth to the development of businessmen, from manufacturing to MSME sector, from growth of the economy to development of New India, everyone has been taken care of in this interim budget. #Budget2019pic.twitter.com/y7a62TuEWg
— ANI (@ANI) February 1, 2019