नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.
अर्थमंत्री पीयूष गोयल अंतरिम अर्थसंकल्प सादर होते, त्यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या खासदारांनी जोरदार बाकं वाजवत पीयूष गोयल यांना प्रोत्साहन दिले. देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतील अशी घोषणा पीयूष गोयल यांनी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 'वाह-वाह' असे म्हणत बाकावर थाप मारली. तर दुसरीकडे, गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना भाजपाच्या खासदारांनी विचारले, 'हाउ इज द जोश?' दरम्यान, चित्रपटसृष्टीसाठी काही योजना जाहीर करताना अर्थमंत्री पियुष गोयल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'चा उल्लेख करण्यात आला. याच चित्रपटातील 'हाउ इज द जोश?' हा डायलॉग आहे.
Budget 2019 Latest News & Live Updates
केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
- असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा, 21 हजार रुपये पगार असणाऱ्या असंघटित कामगारांना मासिक 3 हजार रुपये पेन्शन मिळणार, 10 कोटी कामगारांना याचा लाभ मिळणार
- 21 हजारपर्यंत पगार असलेल्या असंघटीत कामगारांना बोनस, कामगारांना 7 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा.
- पशू आणि मत्स्यपालनासाठी कर्जात 2 टक्क्यांची सवलत
- किसान सन्मान निधी योजनेसाठी 75 कोटी
- सरकार कामधेनू योजना सुरू करणार
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
- दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होणार
- गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ
- यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला
- आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत
- एनपीए कमी करण्यावर आम्ही भर दिला, क्लीन बँकिंगच्या दिशेनं पाऊल टाकलं