Join us

Budget 2019 Update: २० रुपयांचं नाणं चलनात येणार; अन्य नाणीही नवी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 1:09 PM

Budget 2019 Impact on Economy: मार्च महिन्यात मोदी सरकारने २० रुपयांचे नाणे चलनात आणण्याची घोषणा केली होती.

गेल्या काही वर्षात १० रुपये, ५० रुपये, १०० रुपये आणि ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. मोदी सरकार-१ च्या कार्यकाळात २०० आणि २००० रुपयांची नोट नव्याने दाखल झाली. आता मोदी २.० मध्ये २० रुपयांचं नाणं बाजारात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात केली. 

सध्या अस्तित्वात असलेली १, २, ५ आणि १० रुपयांची नाणीही नव्या रूपात चलनात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. अंध व्यक्तींनाही सहज ओळखता येतील, अशी खास व्यवस्था या नाण्यांमध्ये केली जाणार आहे. 

मार्च महिन्यात मोदी सरकारने २० रुपयांचे नाणे चलनात आणण्याची घोषणा केली होती. या नाण्याला १२ कडा असणार आहेत. पूर्वी दोन रुपयांचे नाणे या आकारात होते. तसेच याचा व्यास २७ मिमी आणि वजन ८.५४ ग्रॅम असणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणाः

>> राष्ट्रीय बँकांना ७० हजार कोटींची मदत

>> लघू आणि मध्यम उद्योगांसाठी 350 कोटी

>> विमा क्षेत्रात १०० टक्के परकीय गुंतवणुकीस मान्यता

>> रोबो आणि विशेष मशिन्ससाठी बँका अर्थसहाय्य करणार

>> 'खेलो भारत' योजनेचा विस्तार करणार; राष्ट्रीय क्रीडा शिक्षण बोर्डाची स्थापना करणार

>> स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दूरदर्शनचं स्वतंत्र चॅनेल सुरू करणार

>> इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्यांना विशेष कर सवलत

>> ३ कोटी छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याची योजना

>> ३५ कोटी एलईडी बल्बच्या वाटपामुळे १८,३४१ कोटींची वीजबचत

>> गेल्या वर्षभरात एनपीएमध्ये १ लाख कोटी रुपयांची घट, ४ लाख कोटींहून अधिक वसुली

>> अनिवासी भारतीयांना आधार कार्ड देणार; त्यांना १८० दिवस वाट बघावी लागणार नाही.

बजेटमधील सर्व महत्त्वपूर्ण घोषणा एका क्लिकवर

 

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2019निर्मला सीतारामननरेंद्र मोदीनिश्चलनीकरण