Join us

Budget 2019: NRI भारतीयांना 180 दिवसांत आधार कार्ड देणार; मोदी सरकारचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 3:13 PM

इतकचं नाही तर आधार कार्ड मिळाल्यानंतर एनआरआयला इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणं सोपं जाणार आहे. सध्याच्या नियमानुसार देशाच्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड नंबर काढण्याचा अधिकार आहे.

मुंबई - ज्या एनआरआयकडे भारतीयपासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिलं जाईल, 180 दिवसांसाठी थांबावं लागतं हा नियम आहे, पण आता त्याची गरज नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. त्यामुळे परदेशी राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निर्मला सीतारामन यांनी भाषणात सांगितले की, भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवसांची वाट न बघता आधार कार्ड सहज उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे याचा फायदा परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांना देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही. 

इतकचं नाही तर आधार कार्ड मिळाल्यानंतर एनआरआयला इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणं सोपं जाणार आहे. सध्याच्या नियमानुसार देशाच्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड नंबर काढण्याचा अधिकार आहे. मात्र भारतीय पासपोर्टधारक एनआरआय यांना 180 दिवस यासाठी वाट बघावी लागत होती. आधार कार्डासाठी इतके दिवस वाट पाहावं लागणं परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी खूपच त्रासदायक होतं. 

तसेच भारताला उच्च शिक्षणाचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न केले जाणार असून राजघाटाला राष्ट्रीय स्वच्छता केंद्र बनविले जाणार. त्याचसोबत अर्थसंकल्पात खेलो भारत योजना जाहीर करण्यात आली. ऑनलाइन कोर्सेसना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार. याच अंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणासाठी बोलविलं जाणार आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाच वर्षांपूर्वी जगातील 200 टॉप विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नव्हतं, आपण यावर काम केलं, आता आपल्या तीन संस्था यामध्ये आहेत. विदेशी मुलांना भारतात चांगले शिक्षण घेता यावं यासाठी Study In India हा कार्यक्रम सुरु केला जाईल, यामुळे परदेशातले विद्यार्थीही भारतात शिकण्यासाठी येतील. 

परदेशी गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. विमा क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणूक होऊ शकेल. तसेच  जिथे भारताचे राजदूत नाहीत, तिथे दुतावास सुरु केले जातील, 2018 मध्ये आफ्रिका खंडातील 18 देशांमध्ये दुतावास उघडण्यात आले आहेत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.   

 

टॅग्स :केंद्रीय अर्थसंकल्प 2019आधार कार्डपासपोर्टभारतनिर्मला सीतारामन