Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2020 : हा अर्थसंकल्प दिशादर्शक परंतु अपुरा

Budget 2020 : हा अर्थसंकल्प दिशादर्शक परंतु अपुरा

अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम या अर्थसंकल्पाने उत्तम केले आहे, पण वित्तीय तूट कमी राखण्यासाठी विविध क्षेत्रावर पुरेसा खर्च करण्यासाठी तरतुदी केल्या नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 11:33 AM2020-02-02T11:33:20+5:302020-02-02T11:33:47+5:30

अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम या अर्थसंकल्पाने उत्तम केले आहे, पण वित्तीय तूट कमी राखण्यासाठी विविध क्षेत्रावर पुरेसा खर्च करण्यासाठी तरतुदी केल्या नाहीत.

Budget 2020: This budget is directional but insufficient | Budget 2020 : हा अर्थसंकल्प दिशादर्शक परंतु अपुरा

Budget 2020 : हा अर्थसंकल्प दिशादर्शक परंतु अपुरा

- डॉ.निरंजन हिरानंदानी
(अध्यक्ष, असोचेम, राष्ट्रीय घरबांधणी विकास समिती.)

अर्थव्यवस्थेला दिशा देणारा आणि कृषी, शिक्षण, प्रशिक्षण यासारख्या मुलभूत क्षेत्रावर भर देणारा अर्थसंकल्प आहे. अर्थव्यवसंस्थेला विधायक धक्का देण्यात मात्र यात यश आलेले नाही.
अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम या अर्थसंकल्पाने उत्तम केले आहे, पण वित्तीय तूट कमी राखण्यासाठी विविध क्षेत्रावर पुरेसा खर्च करण्यासाठी तरतुदी केल्या नाहीत. गेल्या वर्षांपेक्षा ०.५ टक्का अधिक तूट त्यांनी राखली. खरे तर त्यात आणखी एक टक्क्याची वाढ केली असती तर एक दीड लाख कोटी रुपये उपलब्ध झाले असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला गती मिळाली असती.
अर्थमंत्र्यांनी देशाच्या सर्वंकष विकासासाठी जे दिशादर्शन केले आहे, त्याचे ऐतिहासिक अशा शब्दांत वर्णन करायला हवे, असे सांगून ते म्हणाले, ग्रामीण आणि कृषी विकासाचे जे तपशील देण्यात आलेले आहेत ते आश्वासक आहेत. अल्प काळासाठी त्याचे परिणाम कदाचित दिसणारही नाहीत; पण मध्यम आणि दीर्घकालीन परिणाम विधायक ठरतील. प्राप्तिकर रचनेमध्ये करण्यात आलेले बदल महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये खर्च, मागणी यावर परिणाम होईल.
मात्र, व्यक्तिगत कमाल ४२ टक्के या दरात बदल केले नाहीत. एकीकडे आपण परकीय गुंतवणूकदारांना सवलत देतो, पण तेच देशातील गुंतवणूकदारांना मिळत नाही, हे बरोबर नाही.
या अर्थसंकल्पात घरबांधणी क्षेत्राला मोठ्या सवलती अपेक्षित होत्या; पण तसे झाले नाही. करविषयक काही तरतुदीनुसार काही सकारात्मक परिणाम होणार आहेत. त्याचप्रमाणे परवडणाऱ्या घरासाठीची सवलत एक वर्ष वाढविली आहे. मात्र, जागांचे प्रचलित दर आणि सरकारने निर्धारित केलेले दर यातील तफावत दूर व्हायला हवी.
रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पदवीधरांना प्रशिक्षण, अनुभव, कुशलता वाढीसाठीच्या योजना महत्त्वाच्या ठरणार आहेत. महिलांविषयक योजनाही महत्त्वाच्या आहेत. अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप मिळण्यापूर्वी काही मोठया तरतुदी होणे आवश्यक आहे. वित्तीय तूट, संभाव्य चलनवाढ यापेक्षाही अर्थव्यवस्था गतिमान करणे आज गरजेचे आहे, त्यासाठी आम्ही संघटना पातळीवर प्रयत्न
करू.
 

Web Title: Budget 2020: This budget is directional but insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.