नवी दिल्ली - देशावर दाटलेल्या मंदीच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2019-20 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर मांडला. या सर्व्हेनुसार 2019-20 या सरत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 5 टक्के राहिला आहे. तर 2020-21 या आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.50 टक्के राहील, असा अंदाज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
Economic Survey projects economic growth at 6% to 6.5% in 2020-21; Survey asks Government to deliver expeditiously on reforms. pic.twitter.com/QHKn9PcZ4D
— ANI (@ANI) January 31, 2020
आगामी आर्थिक वर्षातील विकारदराबाबतच्या अंदाजामध्ये चालू आर्थिक वर्षापेक्षा 0.5 ते 1 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. तर चालू आर्थिक वर्षासाठी विकासदराचा अंदाज हा 5 टक्के एवढा वर्तवण्यात आला आहे. तर वित्तीय वाढ ही 5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार केंद्र सरकार 2020 ते 2025 या आर्थिक वर्षांमध्ये इंफ्रा सेक्टरमध्ये 102 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
पुढच्या तीन वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 1.4 ट्रिलीयन डॉलर म्हणजेच 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज आहे, असा सल्लाही या सर्वेमधून देण्यात आला आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने 120 कोटी टन मालाची वाहतून केली. त्याबरोबरच भारतीय रेल्वे जगातील चोथी सर्वात मोठी मालवाहक बनली.