नवी दिल्लीः शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं किसान रेल योजनेची तयारी केली आहे. रेल्वे मंत्रालयानं यासाठी 9 रेफ्रिजरेटर डबे कपूरथच्या रेल्वेच्या कारखान्यातून खरेदी केलेले आहेत. बजेटमध्ये रेल कृषी योजनेची घोषणा केल्यानंतर लागलीच रेल्वे मंत्रालयानं यावर काम सुरू केलं आहे. एका रेफ्रिजरेटर पार्सल व्हॅन (Refrigerator Parcel Van)ची क्षमता 17 टनांची आहे. भारतीय रेल्वेनं खासगी सार्वजनिक भागीदारी(PPP)च्या माध्यमातून किसान रेल सुरू करण्याचं ठरवलं असून, लवकर नाशवंत होणाऱ्या भाजीपाल्याची या रेफ्रिजरेटर डब्यांतून वाहतूक केली जाणार आहे. दूध, मांस आणि मासे असा लवकर नाशवंत होणारा माल ग्रामीण भागातून शहरी भागात पोहोचवण्यासाठी या रेफ्रिजरेटर डब्यांचा वापर होणार आहे.
किती असणार भाडं?
किसान रेलच्या फेऱ्यांनुसार बुकिंग केलं जाणार आहे. मालाचं भाडं हे सामान्य भाड्यापेक्षा दीडपटीनं अधिक असणार आहे.
4 कार्गो सेंटर होणार तयार
फळं आणि भाजीपाल्याच्या लोडिंग आणि अनलोडिंगसाठी एक प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. सरकार या पायलट प्रोजेक्टअंतर्गत 4 कार्गो सेंटर तयार करणार आहे. कार्गो सेंटर गाझीपूर, न्यू आझादपूर, लासलगाव, राजाचा तलावमध्ये बनवले जाणार आहेत.
या ठिकाणी तयार होणार रेल्वे लॉजिस्टिक सेंटर
रेल्वेच्या योजनेनुसार एक ऍग्रीकल्चर लॉजिस्टिक सेंटरसुद्धा तयार करण्यात येणार आहे. रेल्वेची पीएसयू कॉनकॉर याचं निर्माण करणार असून, ऍग्रीकल्चर लॉजिस्टिक सोनीपतमध्ये बनवलं जाणार आहे. हे लॉजिस्टिक सेंटर 16.40 एकरांमध्ये तयार केलं जाणार आहे.
98 रेफ्रिजरेटर रेल कंटेनर खरेदी करण्याची योजना
भविष्यात 98 रेफ्रिजरेटर रेल कंटेनर खरेदी करण्याची रेल्वेची योजना आहे. याचं मॉडल खासगी सार्वजनिक भागीदारी (PPP)च्या माध्यमातून तयार करण्यात आलं आहे.
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 'किसान रेल'ची तयारी सुरू! घरबसल्या असा मिळणार फायदा
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं किसान रेल योजनेची तयारी केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 07:44 PM2020-02-03T19:44:49+5:302020-02-03T19:48:04+5:30
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं आणि त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं किसान रेल योजनेची तयारी केली आहे.
Highlightsशेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं किसान रेल योजनेची तयारी केली आहे.रेल्वे मंत्रालयानं यासाठी 9 रेफ्रिजरेटर डबे कपूरथच्या रेल्वेच्या कारखान्यातून खरेदी केलेले आहेत. एका रेफ्रिजरेटर पार्सल व्हॅन (Refrigerator Parcel Van)ची क्षमता 17 टनांची आहे.