नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत बजेट सादर करत आहेत. बजेट सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारनं महागाई नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे. महागाई कमी करण्यात सरकारला यश आलेलं आहे. बँकांची परिस्थिती सुधारली असून, सरकारी योजना गावागावांपर्यंत पोहोचल्यानं अनेकांना त्याचा फायदा मिळाला. तसेच घरगुती खर्चात 4 टक्के कपात आलेली आहे. मोदी सरकारनं इन्स्पेक्टर राज संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सरकार मोठ्या जोशानं देशाची सेवा करत असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी अधोरेखित केलं आहे. देशातील गरजू नागरिकांना स्वस्त घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असून, महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आलं आहे. बँकांची स्थिती मजबूत झाली, 60 लाख नवे करदाते तयार झालेत. आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर केंद्र सरकारनं भर दिलेला आहे.पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे, तसेच 6.11 कोटी शेतकऱ्यांसाठी विमा योजना राबवण्यात आली आहे. 2006 ते 2016 या दहा वर्षांत देशातील 27 कोटी 10 लाख जनतेला गरिबी रेषेच्या वर आणण्यात मोदी सरकारला यश आलेलं आहे. कृषी क्षेत्रासाठी 16 सूत्रीय अॅक्शन प्लान तयार केलेला असून, 20 लाख शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजना, पाणीटंचाई असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी खास योजना राबवण्यात येणार आहेत.आर्थिक प्रकरणात महसूल, खर्च, वित्तीय सेवा, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन या विभागांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. बजेट तयार करण्यासाठी या संबंधित विभागांचे अधिकारी, सचिव आणि त्याचबरोबर मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) आणि सरकारचे प्रधान आर्थिक सल्लागार (पीईए) यांचं विशेष योगदान असतं. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून महागाई वाढत चालली होती. कांद्यांचे आणि भाज्यांचे दरात कमालीची वाढ झाल्याचं समोर आलं होतं. कांदा प्रतिकिलो 150 रुपयांवर गेलेला पाहायला मिळालं. परंतु कांद्याचे दर पुन्हा खाली आले असून, निर्मला सीतारामण यांनी महागाई दर नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे.
Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:43 AM
Budget 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत बजेट सादर करत आहेत.
ठळक मुद्देकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत बजेट सादर करत आहेत. बजेट सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारनं महागाई नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे.बँकांची परिस्थिती सुधारली असून, सरकारी योजना गावागावांपर्यंत पोहोचल्यानं अनेकांना त्याचा फायदा मिळाला.