नवी दिल्लीः देशातल्या बजेटमध्ये निर्मला सीतारामण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारनं सुरुवातीपासूनच टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनवर जोर दिलेला आहे. संसदेचा बजेट सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढच्या 5 वर्षांसाठी क्वांटम ऍप्लिकेशनवर 8 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचं जाहीर केलं आहे. क्वांटम टेक्नॉलॉजी हे नव तंत्रज्ञान आहे. येत्या पाच वर्षांत या टेक्नॉलॉजीवर 8 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. भारत हा तिसरा सर्वात मोठा देश असेल, जो या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
काय आहे क्वांटम टेक्नॉलॉजी?
क्वांटम टेक्नॉलॉजी एक असं तंत्रज्ञान जे ऑर्टिफिशल इंटेलिजन्सचा भाग आहे. टेक्नॉलॉजीच्या जगतात अनेक काळापासून क्वांटम कॉम्प्युटरवर काम केलं जातंय. अनेक व्यवहार आणि कार्यालयीन कामात क्वांटम कॉम्प्युटरचा वापर केला जातो. टेक्नॉलॉजी तज्ज्ञांच्या मते, क्वांटम सिद्धांतावर काम करणाऱ्या तंत्रज्ञानात सुधारणेला बराच वाव आहे. रिसर्चसाठी हा चांगला पर्याय आहे.
क्वांटम कॉम्प्युटर हा जगातील सर्वात ताकदवान कॉम्प्युटर समजला जातो. क्वांटम कॉम्प्युटरच्या मदतीनं काम जलद गतीनं होत असून, नव्या औषधांच्या शोधासाठी मॅनेजमेंट आणि ट्रान्सपोर्टला फायदेशीर ठरत आहे. जगातली दिग्गज कंपनी असलेली गुगलच्या माहितीनुसार कॉम्प्युटिंग रिसर्चशी संबंधित एका एक्सपेरिमेंटल क्वॉन्टम प्रोसेसर डेव्हलप करण्यात यशस्वी ठरले आहेत. क्वाँटमचा स्पीड हा वाखाणण्याजोगा असून, यात फिजिक्सचा सिद्धांत लागू होत नाही.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा
Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता
Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण
Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर