नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. वित्तमंत्री निर्मला सीताराम यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प निराशाजनक आणि दिशाहीन आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार केवळ बोलण्याचे काम करते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कुठलीही भक्कम तरतूद करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीबाबत काहीही उल्लेख नाही. कुठलीही मध्यवर्ती कल्पना नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प आहे.
Congress leader Rahul Gandhi: Maybe this was the longest #Budget speech in history but it had nothing, it was hollow. https://t.co/1j2Gf1mM5Ipic.twitter.com/lPpap3PaTJ
— ANI (@ANI) February 1, 2020
''निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. वित्तमंत्र्यांनी केलेले भाषण मोठे होते. मात्र त्यात सांगण्यासारखे काहीच नव्हते. हा अर्थसंकल्प पोकळ ठरला,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.