Join us

बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 3:08 AM

गेल्या अर्थसंकल्पात सरकारने बालकल्याणावरील अनुदान २१,६४४ कोटी केले खरे, पण गेल्या पाच वर्षांत बाल शिक्षण व स्वास्थ्य यावरील अनुदानात घटच झाली आहे. हे अनुदान यंदा वाढणार का?

- सोपान पांढरीपांडेनागपूर : गेल्या अर्थसंकल्पात सरकारने बालकल्याणावरील अनुदान २१,६४४ कोटी केले खरे, पण गेल्या पाच वर्षांत बाल शिक्षण व स्वास्थ्य यावरील अनुदानात घटच झाली आहे. हे अनुदान यंदा वाढणार का?बालकांसाठी ज्या योजना असतात, त्याचे विकास, शिक्षण, स्वास्थ्य व सुरक्षा हे चार भाग आहेत. अनुदानाची किती टक्के रक्कम कुठल्या भागावर खर्च होते, याचे विश्लेषण होते. समग्र शिक्षा अभियानात माध्यान्ह भोजन, मोफत शिक्षण योजना आहेत. बालक स्वास्थ्य योजनेत २०३० पर्यंत जन्मदर व नवजात बालकांचा मृत्यूदर १००० मागे १० पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.२०१५-१६ मध्ये बाल शिक्षणावर अनुदानाच्या ७९.०२ टक्के रक्कम खर्च होत होती. स्वास्थ्य योजनांवर ३.९३ टक्के खर्च होत होती. बालविकास व बाल सुरक्षा यांवर अनुक्रमे १५.८६ टक्के व १.८१ टक्के अनुदान खर्च होते.चालू अर्थसंकल्पात बालकांच्या शिक्षणाचा खर्च अनुदानाच्या १०.४८ टक्क्याने कमी होऊन ६८.५४% झाला. बाल स्वास्थावरील अनुदान ०.४२ टक्क्याने कमी होऊन ३.५१ टक्के झाले. बालविकासावरील अनुदान १०.०३ टक्क्याने वाढून २५.८९ टक्के झाले, तर बाल सुरक्षेवरील खर्च ०.३० टक्क्याने वाढून २.११ टक्के झाला. त्यामुळे यंदा बालशिक्षण व स्वास्थ्य यावरील खर्च वाढतो की आणखी कमी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.यंदा तरी या अनुदानात वाढ होऊन बाल शिक्षण आणि स्वास्थासाठी त्याचा विनियोग व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :बजेटविद्यार्थीबजेट क्षेत्र विश्लेषणनिर्मला सीतारामन