Join us

budget 2021 : १ काेटी वाहने भंगार धाेरणाच्या छायेखाली, १५ दिवसांमध्ये मिळणार महिती : वाहन उद्याेगाला मिळणार बूस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 4:04 AM

budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बहुप्रतीक्षित वाहन भंगार धाेरणाची घाेषणा केली. यामुळे वाहन उद्याेगात गुंतवणूक वाढणार असून, सुमारे १ काेटी वाहने या धाेरणांतर्गत येणार आहेत, तसेच ५० हजार राेजगार निर्मितीही नव्या धाेरणामुळे हाेणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बहुप्रतीक्षित वाहन भंगार धाेरणाची घाेषणा केली. यामुळे वाहन उद्याेगात गुंतवणूक वाढणार असून, सुमारे १ काेटी वाहने या धाेरणांतर्गत येणार आहेत, तसेच ५० हजार राेजगार निर्मितीही नव्या धाेरणामुळे हाेणार आहे.केंद्रीय परिवहन, महामार्ग व सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्र्यांच्या घाेषणेचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, सध्या २० वर्षांहून जुनी ५१ लाख तर १५ वर्षांहून जुनी ३४ लाख हलकी चारचाकी वाहने आहेत, तसेच १५ वर्षे जुनी झालेली १७ लाख मध्यम व अवजड वाहने फिटनेस प्रमाणपत्रांशिवाय रस्त्यावर धावत आहेत. ही वाहने नव्या वाहनांच्या तुलनेत १० ते १२ पट प्रदूषण करतात. अशी वाहने भंगारात काढल्यामुळे अनेक फायदे आहेत. त्यांची पुनर्प्रक्रिया हाेईल, लाेक जास्त सुरक्षित नवी वाहने घेतील, प्रदूषण कमी हाेईल, इंधन बचतही हाेईल आणि त्यामुळे कच्च्या तेलाची आयातही कमी हाेण्यास मदत हाेईल, तसेच गुंतवणूक वाढेल आणि पैसा खेळता राहील. भंगार धाेरणातील सविस्तर माहिती १५ दिवसांमध्ये येईल, असे गडकरी म्हणाले. या धाेरणामुळे वाहन उद्याेगाला चालना मिळेल, असे केंद्रीय परिवहन, महामार्ग व सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याेगमंत्री  नितीन गडकरी यांनी सांगितले. काय आहे भंगार धाेरण२० वर्षे जुनी खासगी वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य राहील, तर व्यावसायिक वाहनांसाठी ही मर्यादा १५ वर्षांची असेल. सरकारने २०१९ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी, यासाठी १५ वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी माेटर वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला हाेता.

टॅग्स :बजेट 2021वाहतूक कोंडी