Lokmat Money > बिझनेस न्यूज > budget 2021 : महामार्गांना ‘बूस्ट’, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामवर भर

budget 2021 : महामार्गांना ‘बूस्ट’, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामवर भर

budget 2021: देशातील महामार्गांचे जाळे मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 03:50 AM2021-02-02T03:50:40+5:302021-02-02T06:54:34+5:30

budget 2021: देशातील महामार्गांचे जाळे मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे.

budget 2021: Boost highways, focus on West Bengal, Tamil Nadu, Kerala, Assam | budget 2021 : महामार्गांना ‘बूस्ट’, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामवर भर

budget 2021 : महामार्गांना ‘बूस्ट’, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामवर भर

नवी दिल्ली : देशातील महामार्गांचे जाळे मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. भारतमाला योजनेंतर्गत मार्च २०२२ अखेरपर्यंत आणखी ८ हजार ५०० किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. राष्ट्रीय महामार्ग ‘कॉरिडॉर’वर ११ हजार किलोमीटरचे मार्ग पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिवाय आणखी ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’चे नियोजन करण्यात आले आहे.
भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग विभागासाठी १ लाख १८ हजार १०१  कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांतील आगामी निवडणुका लक्षात घेता, तेथे महामार्ग विस्ताराच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Web Title: budget 2021: Boost highways, focus on West Bengal, Tamil Nadu, Kerala, Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.