Join us  

Budget 2021: महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा द्या! बजेटमधून यावर्षी वाढ नव्हे तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 2:38 AM

गॅसच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. बजेटमध्ये यासाठी मोठी तरतूद करा.

कोरोनाने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यात या आगीत महागाई तेल ओतत आहे. परिणामी येत्या काही दिवसांत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात दिलासा मिळेल, अशा गोष्टी सादर करा, असे म्हणणे सर्वसामान्य माणसाने मांडले आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार, सुरक्षा, महिला सबलीकरण अशा प्रत्येक क्षेत्राला दिलासा मिळेल, असे बजेट सादर करा, अशी त्यांची मागणी आहे. 

कोरोना संकट डोळ्यासमोर ठेवून बजेट मांडले पाहिजे. काय स्वस्त आणि काय महाग, हे दाखविताना बजेटमध्ये प्रत्येक क्षेत्राला दिलासा कसा मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. थोडक्यात कोरोनामुळे हाेरपळलेल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे, बाकी काही नाही. - अरविंद गीते 

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले पाहिजे. कर वाढविता कामा नये. घराच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. गॅस स्वस्त झाला पाहिजे. आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली पाहिजे. कारण कोरोना अजून नष्ट झालेला नाही. थोडक्यात बजेटमधून यावर्षी वाढ नव्हे तर दिलासा अपेक्षित आहे. - प्रशांत बारामती

गॅसच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. बजेटमध्ये यासाठी मोठी तरतूद करा. महिलांना रोजगार मिळेल असे काहीतरी करा. उद्योग आणि व्यापार या क्षेत्रात महिलांना आणखी संधी द्या. - प्राजक्ता मोहिते

घरांच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घ्या. कारण हे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. एक घर घेण्यासाठी माणसाला आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालावे लागते. यात दिलासा मिळाला तर बजेट सार्थकी लागले असे म्हणता येईल. - विनोद घोलप

घर चालविणाऱ्या महिलेसाठी काहीतरी करा. घर चालवित असताना तिची तारेवरची कसरत होते. कारण महागाई वाढली आहे. महागाई कमी झाली तर दिलासा मिळेल. बाकी शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा अशा अन्य क्षेत्रांसाठीही भरघोस तरतूद करा. - मेनका सुनके 

 

टॅग्स :बजेट 2021