देशातील अर्थव्यवस्थेचा शेती हा आत्मा आहे. प्रकल्प उभारून शेतीचे क्षेत्र नष्ट करण्यापेक्षा उरलेल्या क्षेत्रावर शेती करण्यासाठी प्राेत्साहन दिले पाहिजे. सरकार याेजना आखते, अमलात आणते. मात्र, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाेहोचत नाही. सरकार स्वतःचे आणि आपल्या राजकीय पक्षाचे ब्रॅण्डिंग करण्यात कमी पडत नाही; परंतु याेजना शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचवण्यासाठी ब्रॅण्डिंग कधी करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने प्रकल्प उभारताना सुपीक शेतीचे क्षेत्र नष्ट हाेणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. शेती राहिली तरच शेतकरी राहणार आहे. ताे राहिला तरच देशातील नागरिक राहणार आहेत. शेतीसाठी पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. - राजन भगत, शेतकरी
केंद्र सरकारने कायदे, तयार करताना शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विचार केला पाहिजे. शेतीच्या माध्यमातून माेठ्या हिस्सा सरकारला प्राप्त हाेताे. त्यामुळे शेतकरी जगला तरच सर्व देश जगणार आहे. सरकारने शेती आणि शेतकरी बुडण्यासाठी काम करू नये. - रंजित म्हात्रे, शेतकरी
शेती हा अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे. आज शेती आणि शेतकरीविराेधी कामे केली जात आहेत. शेती वाढवू नका. मात्र, जे काही क्षेत्र उरले आहे, ते ओरबाडून न घेता शेतीसाठी पायाभूत सविधा निर्माण करा, शेतीला पर्यटनाची जाेड देताना सुविधा दिल्या पाहिजेत. - राजाराम गाेपाळ पाटील, शेतकरी
शेतीमध्ये झपाट्याने क्रांती हाेत आहे. देशभरात विविध शेतकरी नावीन्यपूर्ण शेतीवर प्रयाेग करीत आहेत. शेतीचा व्यवसाय हा बिनभराेशाचा असला तरी, अख्ख्या जगाला हेच एकमेव क्षेत्र आहे. जे वर्षानुवर्षे जिवंत ठेवू शकते. शेती आणि शेतकरी जगला पाहिजे.- हेमंत पाटील, शेतकरी
सरकार स्वतःचे आणि पक्षाचे ब्रॅण्डिंग अगदी व्यवस्थित करते. सरकारकडून विविध याेजना आणल्या जातात. त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पाेहोचतच नाहीत. त्या याेजना राबवण्यासाठी सरकारने ब्रॅण्डिंग केल्यास सर्व याेजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल.- विलास माेकल, शेतकरी