Join us

Budget 2021: सरकारनं लडाखसाठी उघडला पेटारा, जम्मू-काश्मीरसाठीही केली खास घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 2:33 PM

सोलर एनर्जी कॉरपोरेशनसाठी 1000 कोटी रुपये आणि नुतनीकरण ऊर्जा विकास एजन्सीसाठी 1500 कोटी रुपये दिले जातील, अेही त्या म्हणाल्या.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरसाठी एक नवा गॅस पाईपलाइन प्रकल्प सुरू करण्याची घोषणानॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी 50 हजार कोटी रुपयांची व्यवस्थानॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्किम सुरू केली जाईल

नवी दिल्ली - संसदेत अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखसाठी मोठी घोषणा केली आहे. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जाईल. तसेच, देशात 100 नव्या सैनिकी शाळा आणि देशभरात 15 हजार आदर्श शाळा सुरू केल्या जातील, असे सीतारण यांनी म्हटले आहे. याच बरोबर, जम्मू-काश्मीरसाठी एक नवा गॅस पाईपलाइन प्रकल्प सुरू करण्याची घोषणाही सीतारमण यांनी केली आहे. तसेच सोलर एनर्जी कॉरपोरेशनसाठी 1000 कोटी रुपये आणि नुतनीकरण ऊर्जा विकास एजन्सीसाठी 1500 कोटी रुपये दिले जातील, अेही त्या म्हणाल्या.

नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्किम सुरू केली जाईल -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली, की देशात चांगल्या रोजगारासाठी कौशल विकास तथा प्रशिक्षणाच्या दृष्टीने तरुणांना तयार करण्यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्किम सुरू केली जाईल. तसेच, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत इतरही प्रकल्प सुरू केले जातील.

नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी 50 हजार कोटी रुपयांची व्यवस्था -निर्मला सीतारमण आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या, नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 मधील तरतुदीनुसार, हायर एजुकेशन कमीशनची स्थापना करण्यात आली आहे. हे देशातील उच्च शिक्षणाचे एकमेव नियामक असेल. 2019च्या अर्थसंकल्पात नॅशनल रिसर्च फाउंडेशन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता 2021-22 च्या अर्थसंकल्पात त्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी 50 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. जेनेकरून संशोधनास चालना मिळेल.पश्चिम बंगालला गिफ्ट -सरकारने बंगालमध्ये महामार्गांसाठी 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या राष्ट्रीय महामार्गांची लांबी 675 किलोमीटर एवढी असणार आहे. याशिवाय बजेटमध्ये सीतारमण यांनी कोलकाता-सिलीगुडी महामार्गाचेही अपग्रेडेशन करण्याची घोषणा केली आहे. सध्या बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही राजकीय वातावरण तापलेले आहे.

रस्त्याची कामे वेगात -भारतमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ८ हजार किलोमीटरपर्यंतचं कंत्राट मार्च महिन्यापर्यंत देण्यात येईल. रोड इन्फ्रा आणि इकॉनॉनिक कॉरिडोअरवर काम सुरू आहे. सध्या तामिळनाडूत ३ हजार ५०० किमीचे रस्ते तयार होत आहेत. यात मदुरै-कोल्लम कॉरिडोअरचादेखील समावेश आहे, असं सीतारामन म्हणाल्या. 

टॅग्स :बजेट 2021अर्थसंकल्पनिर्मला सीतारामनलडाखजम्मू-काश्मीर