- प्रसाद गो. जोशीनाशिक : केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्प सादर करणारे भाषण सुरू असतानाच शेअर बाजारातील निर्देशांकांमध्ये बदलही होत असतात. एखाद्या घोषणेमुळे एखाद्या क्षेत्राला दिलासा मिळाल्यास त्या क्षेत्रातील कंपन्यांचे भाव वाढतात. परिणामी निर्देशांक वाढतो. किंवा याच्या विपरित घडल्यास त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होऊन निर्देशांक कमी होतो. असे असले तरी कदािचत दुसऱ्या दिवशी बाजाराची त्या क्षेत्राबाबतची प्रतिक्रिया बदललेली दिसते. . अर्थसंकल्पाच्या पोटात दडलेल्या या बाबी अर्थसंकल्पाच्या बारीक अभ्यासातून लक्षात येतात आणि त्यानंतर त्यावरील बाजाराची प्रतिक्रिया ठरते. त्यामुळे शेअर बाजाराची अर्थसंकल्पाबाबतची निश्चित प्रतिक्रिया समजायला वेळच लागण्याची शक्यता मोठी असते.
budget 2021 : अर्थसंकल्पाच्या अभ्यासानंतरच येते बाजाराची खरी प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 6:15 AM