केंद्राचा अर्थसंकल्प म्हटले की सर्वांचा इंटरेस्ट असतो प्राप्तिकरात किती सूट मिळणार आणि काय स्वस्त होणार यात. बजेटच्या दिवशी सेन्सेक्स किती उसळला वा किती आपटला, याचीही चर्चा केली जाते. बजेट उलगडून सांगण्याची प्रथाही अलीकडच्या काळात पडली. त्यामुळे लोकांमध्ये अर्थसाक्षरता येण्यास मदत होते. परंतु बजेटचे हे कवित्व फारफार आठवडाभर टिकते. एकूणच बजेटात काय
असेल, याची उत्सुकता असतेच प्रत्येकाला. यंदा मात्र बजेट पेपरलेस असणार आहे. त्यामुळे बजेटविषयीचे ॲपच विकसित करण्यात आले आहे...
काय असेल ॲपमध्ये?
युनियन बजेट मोबाइल ॲपमध्ये १४ डॉक्युमेंट्स असतील
त्यात मुख्य वार्षिक वित्तीय निवेदन, निधीची मागणी आणि वित्त विधेयक यांचा समावेश असेल
यूझर फ्रेण्डली ॲप. त्यात इंटरफेस असेल. शिवाय डाऊनलोड, प्रिंट, सर्च, झूम इन आणि आऊट असे पर्याय असतील
बायडायरेक्शनल स्क्रोलिंग, टेबल ऑफ कंटेंट्स आणि एक्स्टर्नल लिंक्स हेही असेल
कसे डाऊनलोड करायचे?
युनियन बजेट या संकेतस्थळावरून हे ॲप डाऊनलोड करता येऊ शकेल
कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध असेल?
इंग्रजी आणि हिंदी
मोबाइल ॲप कधी उपलब्ध होईल १ फेब्रुवारी २०२१ रोजी. केंद्रीय अर्थमंत्र्यांचे बजेट सादर करून झाल्यावर.
कोणी विकसित केले आहे हे ॲप?
आर्थिक व्यवहार खात्यांतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी)
कसे डाऊनलोड करायचे?
युनियन बजेट या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येऊ शकेल
https://www.indiabudget.gov.in/downloadapp.php