Join us

Budget 2021 Share Market: वाढता वाढता वाढे... मोदी सरकारच्या बजेटनं शेअर बाजाराला 'बुस्टर डोस'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:38 PM

Budget 2021 Latest News and updates: सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना शेअर बाजारात तेजी

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२ वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत आहेत. कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसत आहेत. मुंबई शेअर बाजाराचानिर्देशांक ९३४ अंकांनी वर गेला आहे. सेन्सेक्सनं ४७ हजारांचा टप्पा पार केला आहे. तर निफ्टी (नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक) १३ हजार ८४२ वर आहे. गाडी खरेदीच्या विचारात असलेल्यांसाठी गुड न्यूज; खिशावरचा ३०% भार हलका होणारनिर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध घोषणा केल्या. आत्मनिर्भर भारत योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामुळे सेन्सेक्स ४६ हजार ७७७, तर निफ्टी १३ हजार ७७३ अंकांवर जाऊन पोहोचला. टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!मुंबई शेअर बाजारातील टॉप ३० कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग तेजीत आहेत. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील टॉप ५० पैकी ३५ कंपन्यांच्या समभागांचं मूल्य वधारलं आहे. इंडसइंड बँकेच्या समभागांचं मूल्य सर्वाधिक वधारलं आहे. बँकेच्या समभागांचं मूल्य ७.३२ टक्क्यांनी वाढलं. निफ्टीवरही बँकेचा समभाग ६.७७ टक्क्यांनी वाढला. याशिवाय आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, मारुती सुझुकी आणि रिलायन्स उद्योगाच्या समभागांच्या किमतीदेखील वधारल्या आहेत.अर्थमंत्र्यांनी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग धोरणाची घोषणा केल्यानंतर महिंद्रा एँड महिंद्रा, मारुती, बजाज ऑटो, अशोक लेलँडच्या समभागांनी उसळी घेतली. या कंपन्यांच्या समभागांचं मूल्य २ टक्क्यांनी वधारलं. काही आठवड्यांपूर्वीच सरकारनं नव्या स्क्रॅपिंग धोरणाला मंजुरी दिली. एप्रिल २०२२ पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होईल. यानंतर वाहन क्षेत्राला नवचैतन्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :बजेट 2021निर्देशांकशेअर बाजारनिर्मला सीतारामन