सलग पाच सत्रात घसरण अनुभवणाऱ्या सोने Gold Rate Today आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. लोकसभेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
good returns वेबसाइटच्या माहितीनुसार देशांतर्गत कमॉडिटी बाजारात सोन्याच्या दरात १० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅममागे ४७,९७० रुपये मोजावे लागणार आहेत. रविवारी संध्याकाळी हाच दर ४७,९६० रुपये इतका होता.
करसवलती की करभार? आज अर्थसंकल्प; अर्थव्यवस्थेला आर्थिक लसीची गरज
दुसरीकडे २४ कॅरेट सोन्याच्या दरातही १० रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९७० रुपये इतका आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९७० रुपये इतका आहे. २४ कॅरेट सोन्यासाठी तो ५२,३२० रुपये इतका झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६,५७० रुपये इतका झाला आहे. बंगळुरू, हैदराबाद आणि केरळमध्ये देशात सर्वात स्वस्त म्हणजेच ४५,८२० रुपये इतका भाव आहे.
अर्थसंकल्पाचे ‘अमृत’ सामान्यांपर्यंत झिरपावे!
दरम्यान, आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सोन्याच्या दरात किंचित वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. सराफ व्यावसायिकांकडून सोन्यावरील शुल्क कपातीची मागणी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात तशी घोषणा झाल्यास सोन्याचे दर कमी होऊ शकतात, असं सांगण्यात येत आहे.