Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2022: अर्थसंकल्पावर सामान्य जनता नाराज, करदात्यांसाठी, महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नसल्याने ७२% लोकांचा हिरमाेड

Budget 2022: अर्थसंकल्पावर सामान्य जनता नाराज, करदात्यांसाठी, महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नसल्याने ७२% लोकांचा हिरमाेड

Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प कसा होता? सामान्यांसाठी, करदात्यांसाठी मुंबई, महाराष्ट्रासाठी यासाठी भरीव असे यामध्ये काही होते का? या प्रश्नावर अनेकांनी अर्थसंकल्पातून आपली निराशा झाली, असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 11:04 AM2022-02-03T11:04:36+5:302022-02-03T11:05:04+5:30

Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प कसा होता? सामान्यांसाठी, करदात्यांसाठी मुंबई, महाराष्ट्रासाठी यासाठी भरीव असे यामध्ये काही होते का? या प्रश्नावर अनेकांनी अर्थसंकल्पातून आपली निराशा झाली, असे म्हटले आहे.

Budget 2022: General public unhappy over budget, lack of adequate provision for taxpayers, Maharashtra | Budget 2022: अर्थसंकल्पावर सामान्य जनता नाराज, करदात्यांसाठी, महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नसल्याने ७२% लोकांचा हिरमाेड

Budget 2022: अर्थसंकल्पावर सामान्य जनता नाराज, करदात्यांसाठी, महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद नसल्याने ७२% लोकांचा हिरमाेड

 मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प कसा होता? सामान्यांसाठी, करदात्यांसाठी मुंबई, महाराष्ट्रासाठी यासाठी भरीव असे यामध्ये काही होते का? या प्रश्नावर अनेकांनी अर्थसंकल्पातून आपली निराशा झाली, असे म्हटले आहे.

दीड लाख लोकांचा सहभाग असलेल्या या सर्वेक्षणात अर्थसंकल्पात करदात्यांना गेल्या काही वर्षांपासून दिलासा न मिळणे हा मोठा धक्का असल्याचे ७२ लोकांचे म्हणणे आह; तर अर्थसंकल्प माझ्या काहीच कामाचा नाही, असे ५८ टक्के लोकांनी म्हटले आहे; तर अर्थसंकल्पानंतरही महागाई वाढत जाणार असल्याचे ५५ टक्के लोकांनी म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात कोरोनाग्रस्तांसंबंधित घोषणांवर आपले मत काय, असे विचारण्यात आले असता, ५० टक्के लोकांनी सरकारने कोरोना महामारीबाबत ठोस घोषणा करणे आवश्यक होते, असे म्हटले आहे. या अर्थसंकल्पावर चांगल्या पद्धतीने काम करण्यात आलेले नाही, असे २९ टक्के लोकांनी म्हटले आहे, तर १८ टक्के लोकांनी याचा काही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात सर्वाधिक कोणत्या क्षेत्रांवर जोर देण्यात आला, असे विचारण्यात आले असता, तब्बल ६३ टक्के लोकांनी यात केवळ दिखावूपणाच्या घोषणांवर जास्त लक्ष देण्यात आले असल्याचे म्हटले आहे; तर २५ टक्के लोकांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीवर जोर देण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
अर्थसंकल्पामुळे कर देणाऱ्यांवर काय परिणाम होणार, असे विचारले असता, कर भरणाऱ्यांसाठी काही विशेष घोषणा नाही, असे ७२ टक्के लोकांनी म्हटले आहे.

 अर्थसंकल्पाबाबत लोक काय म्हणतात?
५८% अर्थसंकल्पात माझ्याबाबत काहीच नव्हते
५५% महागाई वाढणार, जगणे महागणार
७२% करदात्यांना मोठा धक्का बसला आहे 
६३% दिखाउपणा करणारा अर्थसंकल्प 

Web Title: Budget 2022: General public unhappy over budget, lack of adequate provision for taxpayers, Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.