Join us

budget 2022: क्रिप्टो करन्सीवर कसा लागणार टॅक्स ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 11:13 AM

cryptocurrency : एखाद्या उद्योगामध्ये सरकारला देण्यात येणारा कर वाढला तर त्या उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या मंदावते, असे आजपर्यंतचे चित्र आहे.

- दीपक होमकर  पुणे : एखाद्या उद्योगामध्ये सरकारला देण्यात येणारा कर वाढला तर त्या उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या मंदावते, असे आजपर्यंतचे चित्र आहे. मात्र, क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग व्यवसायात शून्यावरून थेट ३० टक्के कर लावण्याची घोषणा केल्यावरही क्रिप्टो मार्केटमध्यील बिटकॉइनसह सर्वच काॅइन्सचा भाव वधारला आणि एकूणच बाजारात तेजी आली.

बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीवर ३० टक्के कर लावणार असल्याची घोषणा करताच घसरणीला लागलेला क्रिप्टो करन्सीचा बाजार वधारण्यास सुरुवात झाली. त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतात क्रिप्टोवर बंदी येणारी की नाही, हा संभ्रम या करप्रणालीमुळे दूर झाला. ज्यांचे क्रिप्टो मार्केटमध्ये पैसे पडून होते ते सर्व पैसे आता त्यांना रुपयांत रुपांतरित करून स्वत:च्या बँक अकाउंटवर सहजपणे घेणे शक्य होणार आहे. त्याबदल्यात त्यांना ३० टक्के रक्कम कर म्हणून सरकारला द्यावी लागणार आहे.

 का वाढली क्रेझ... - क्रिप्टो करन्सी व्यवहाराला भारत सरकारची मान्यता नाही. तरीही झटपट श्रीमंत बनविणारा व्यवसाय अशी ओळख असलेल्या या व्यवसायात अनेक तरुणांनी  गुंतवणूक केली. त्यामुळे  क्रिप्टोमध्ये लाखो  भारतीयांनी १०० पासून लाखो रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. - वझिरएक्स, उनो काॅइन, काॅइन स्वीच कुबेर अशा विविध भारतीय ब्रोकर्स कंपन्यांबरोबरच बिनान्ससारख्या साइट्सवरून अनेक प्रकारच्या डिजिटल काॅइन्सची खरेदी-विक्री सुरू झाली. 

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीअर्थसंकल्प 2022