Join us  

Budget 2023: बजेट सादर होण्याआधी काय-काय घडतं माहितीये? ११ वाजताच्या अर्थसंकल्पासाठी सकाळपासून सुरू होते तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 9:47 AM

आज ११ वाजता लोकसभेत सादर होणार अर्थसंकल्प

Indian Union Budget 2023-24 Live News Updates, Nirmala Sitharaman schedule: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजचा दिवस हा केंद्रीय अर्थमंत्र्यांसाठी व्यस्त वेळापत्रकाचा असणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सकाळी ११ वाजताच्या सुमारास सादर होत असला तरी त्या आधी बऱ्याच गोष्टी घडतात. ११ वाजता सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपासूनच घडामोडींना वेग येतो. अर्थसंकल्प सादर होण्याआधी नक्की काय घडते ते जाणून घेऊया...

असा असतो दिनक्रम!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी सुमारे ८ वाजून ४० मिनिटांनी नॉर्थ ब्लॉकच्या दिशेने निघतात. तेथे पत्रकारांसाठी विशेष फोटो काढण्यात येतात. त्यानंतर अर्थमंत्री अर्थसंकल्पाच्या मंजूरीसाठी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतात. त्यानंतरही पत्रकारांसाठी फोटो काढले जातात. आणि मग ११ च्या सुमारास अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरू होते.

पाहा, असेल आजचं आजचं वेळापत्रक

सकाळी ८.४० वा. - अर्थमंत्री नॉर्थ ब्लॉकसाठी रवानासकाळी ९ वा. - नॉर्थ ब्लॉकच्या गेट क्रमांक २ बाहेर फोटोसकाळी ९.२५ वा. - अर्थसंकल्पावर मंजूरीसाठी अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे रवानासकाळी १० वा. - अर्थमंत्री संसदेकडे परतणार व तेथे बजेट फोटोसेशनसकाळी १०.१० वा. - अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठकसकाळी ११ वा. - संसदेत अर्थसंकल्प सादरीकरणदुपारी ३.४५ वा. - अर्थसंकल्प सादरीकरणानंतरची पत्रकार परिषद

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करतील. जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. भारताच्या उंबरठ्यावर मंदीचे ढग जमू शकतात, असा कयास बांधला जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाजूने कौल देत दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून आज विविध क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2023निर्मला सीतारामन