Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2023 : आयकर दर कमी होणार? उद्यापासून अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक; अर्थसंकल्पाची तयारी

Budget 2023 : आयकर दर कमी होणार? उद्यापासून अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक; अर्थसंकल्पाची तयारी

Union Budget 2023 Meeting : इंडस्ट्री बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने आगामी अर्थसंकल्पासाठी या मागण्या केल्या आहेत. करचुकवेगिरी रोखण्यासाठी पुरेशा दंडात्मक तरतुदी आहेत, असेही म्हटले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 07:33 PM2022-11-20T19:33:01+5:302022-11-20T19:34:10+5:30

Union Budget 2023 Meeting : इंडस्ट्री बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने आगामी अर्थसंकल्पासाठी या मागण्या केल्या आहेत. करचुकवेगिरी रोखण्यासाठी पुरेशा दंडात्मक तरतुदी आहेत, असेही म्हटले आहे. 

Budget 2023: Income tax rate will decrease? Important meeting of Finance Minister nirmala sitharaman from tomorrow; Budget preparation, CII gave Agenda | Budget 2023 : आयकर दर कमी होणार? उद्यापासून अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक; अर्थसंकल्पाची तयारी

Budget 2023 : आयकर दर कमी होणार? उद्यापासून अर्थमंत्र्यांची महत्वाची बैठक; अर्थसंकल्पाची तयारी

नोव्हेंबरच्या मध्यावर आता आगामी अर्थसंकल्पाची (Union Budget 2023) तयारी सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासूनची महागाई, त्यात अर्थसंकल्पात काय वाढून ठेवलेले असेल, यावर चर्चा सुरु झाली आहे. मंदीची झळ बसलेल्या ब्रिटनने करात मोठी वाढ केली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारही तेच करेल अशी धास्ती उद्योगविश्वाला लागली आहे. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारला उद्योगविश्वाने आपला अजेंडा सोपविला आहे. 

या अजेंड्यामध्ये आयकर दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच जीएसटी कायद्याच्या कक्षेतून गुन्हेगारी श्रेणी वगळण्याची, भांडवली नफा कराचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. इंडस्ट्री बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने आगामी अर्थसंकल्पासाठी या मागण्या केल्या आहेत. करचुकवेगिरी रोखण्यासाठी पुरेशा दंडात्मक तरतुदी आहेत, असेही म्हटले आहे. 
उद्योग संस्थेचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणाले, “कॅपिटल गेन टॅक्सचे दर आणि होल्डिंग पीरियड यावर नव्याने विचार करण्याची गरज आहे, जेणेकरून गुंतागुंत आणि विसंगती दूर करता येतील. आयकर कमी केल्यास खर्च करण्यासाठीचे उत्पन्न वाढेल आणि मागणीमध्येही वाढ होईल.'' 

  सीआयआयने म्हटलेय की, कॉर्पोरेट कर देखील सध्या आहे त्याच पातळीवर ठेवावा. उद्योगांसाठी निश्चित कर सुरुच राहिला पाहिजे. दिवाणी प्रकरणांमध्ये, व्यवसायातील गुन्हा सिद्ध होईपर्यंत अटक किंवा अटकेची कारवाई होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. 2023-24 पर्यंत वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 6 टक्के आणि 2025-26 पर्यंत 4.5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भांडवली खर्च सध्याच्या 2.9 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 3.3-3.4 टक्क्यांपर्यंत वाढवला पाहिजे. 2024-25 पर्यंत ते आणखी 3.8 ते 3.9 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. 

अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती देण्यासाठी केवळ सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक पुरेशी नसून खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविली पाहिजे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवार, २१ नोव्हेंबरपासून अर्थसंकल्पपूर्व बैठकांना सुरुवात करणार आहेत. अर्थमंत्री अर्थसंकल्पापूर्वी विविध भागधारकांसोबत बैठका घेतात. सोमवारी अर्थमंत्री इंडस्ट्री चेंबर्स, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि पर्यावरण तज्ज्ञांसोबत तीन गटांच्या बैठका घेणार आहेत. 
 

Web Title: Budget 2023: Income tax rate will decrease? Important meeting of Finance Minister nirmala sitharaman from tomorrow; Budget preparation, CII gave Agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.