Join us

Budget 2023: बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी अपडेट! सामान्यांना सरकार देणार दिलासा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 10:46 AM

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे.

Budget 2023: मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे. देशात सिलेंडरचे दर १००० रुपयांवर गेले आहेत. सरकार सिलेंडरच्या किमती कमी करु शकतात असं बोलले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून तेल कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, आता अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा सरकारने दिला आहे, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ झालेली नाही.

आजही देशभरात गॅस सिलिंडरचे दर जैसे थेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे दरात कपात केलेली नाही. गॅस सिलिंडरच्या दरांचे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला IOCL द्वारे प्रसिद्ध केले जातात.

 सध्या देशभरात गॅस सिलेंडरचे दर एक हजार रुपयांच्या वर गेले आहेत. 

काळजी नको! कोट्यवधी पॉलिसीधारकांना LIC चा सुखद धक्का; 'अदानी'च्या शेअर्सबाबत मोठा खुलासा

देशात घरगुती सिलिंडरचे दर-दिल्ली - रु. 1053मुंबई - रु. 1052.5कोलकाता - रु. 1079चेन्नई - रु. 1068.5

व्यावसायिक सिलिंडरचे दर-दिल्ली - रु. 1769मुंबई - रु. 1721कोलकाता - रु. 1870चेन्नई - 1917 रु.

गेल्या वर्षभरात सिलिंडर 153.5 रुपयांनी महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतील शेवटचा बदल 6 जुलै 2022 रोजी करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 153.5 रुपयांनी वाढल्या आहेत.

आज केंद्राचा अर्थसंकल्प आहे. आज देशातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :अर्थसंकल्प 2023व्यवसाय