Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

budget 2023: अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल १,०४,२७३ कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 09:25 AM2023-02-02T09:25:28+5:302023-02-02T09:25:53+5:30

budget 2023: अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल १,०४,२७३ कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत.  

Budget 2023: Now 'Digital Library' in schools, 38 thousand teachers will be recruited in 3 years | budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

budget 2023: शाळांमध्ये आता ‘डिजिटल लायब्ररी’, ३ वर्षात ३८ हजार शिक्षकांची केली जाणार भरती

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल १,०४,२७३ कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत.  प्रादेशिक भाषांचा अधिक वापर आणि डिजिटल लायब्ररींची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येईल. तसेच, एकलव्य मॉडेल स्कूलही सुरू करण्यात येणार आहेत. 

साडे तीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सेवा देणाऱ्या ७४० शाळांमध्ये  पुढील ३ वर्षांत तब्बल ३८ हजार शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. म्हणजेच शाळेसोबतच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. 
शैक्षणिक संस्थांमध्ये  आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्रे बांधली जातील. सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये तीन उत्कृष्टता केंद्रे 
उघडली जातील.  यामध्ये उद्योगातील आघाडीचे तज्ज्ञ सहभागी असतील. ते नवीन ॲप्लिकेशन्स विकसित 
करण्यात आणि आरोग्य, कृषी इत्यादींशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी मदत करतील.

‘सुखासन’ 
    सुखासनामुळे मन शांत होते. मेंदूही शांत होतो. खूप थकवा येत असेल तर या आसनामुळे आराम मिळतो. सुखासन केल्याने नैराश्य आणि चिंताही दूर होतात.
    अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राविषयी असलेल्या तरतुदी पाहता विद्यार्थ्यांना भविष्यात नैराश्य येऊ नये, त्यांच्या चिंता दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केल्याचे आणि शिक्षणक्षेत्रासाठी या अर्थसंकल्पाने एकाअर्थी ‘सुखासन’ योग साधल्याचे दिसते.

माेबाईल, काॅम्प्युटरवर पुस्तके
मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी भौगोलिक, 
भाषा, शैली आणि स्तरांवरील दर्जेदार पुस्तकांची सोय करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना केली जाईल. यामध्ये सर्व विषयांची आणि सर्व विभागांची पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. प्रत्येकाला राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाचा लाभ घेता यावा यासाठी वॉर्ड आणि पंचायत स्तरावर ग्रंथालये  स्थापन करण्यासाठी आणि राष्ट्रीय 
डिजिटल ग्रंथालयाच्या संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
सर्व वयोगटांसाठी सुविधा
लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी डिजिटल लायब्ररीचीही घोषणा करण्यात आली. सर्व शाळा डिजिटल लायब्ररीशीही जोडल्या जातील जेणेकरून मुलांना पुस्तकांपर्यंत पोहोचता येईल. प्रादेशिक आणि इंग्रजी भाषांमध्येही पुस्तके उपलब्ध असतील. यामध्ये सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने पुस्तके उपलब्ध होणार आहेत.
डिजिटल लायब्ररी म्हणजे काय?
डिजिटल लायब्ररी म्हणजे अशी लायब्ररी ज्यामध्ये पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्या उपलब्ध असतात. यात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल स्वरूपात मजकूर, फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ देखील समाविष्ट आहे.

शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयाेग आणि शहरी भाग ते वाड्या-तांड्यावरील विद्यार्थ्यांचा विचार करून याेजना आखल्या आहेत.
सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये तीन उत्कृष्टता केंद्रे उघडली जातील. नवीन ऍप्लिकेशन्स विकसित करण्यात आणि आरोग्य, कृषी संबंधित समस्या सोडवण्यास मदत

Web Title: Budget 2023: Now 'Digital Library' in schools, 38 thousand teachers will be recruited in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.