अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. जगभरात मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नोकरकपातीचा धडाका लावला आहे. असे असताना अर्थमंत्री सीतारामन यांनी वस्तूंचे कर वाढविले, कमी केले आहेत. जाणून घेऊया काय स्वस्त काय महाग होणार आहे....
काय महागले...
- देशी किचन चिमनी महागली आहे.
- परदेशातून येणारी सोने, चांदी, प्लॅटिनम महागले आहे.
- सिगारेट महागली आहे. सिगरेटवर आपत्कालीन कर आता १६ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे.
- हिरे, एक्स-रे मशीन, छत्री, दारू
काय स्वस्त झाले....
- काही मोबाईल फोन, कॅमेरांचा लेन्स स्वस्त झाले आहेत.
- इलेक्ट्रीक व्हेईकल स्वस्त झाले आहेत.
- एलईडी टीव्ही, बायोगॅसशी संबंधीत गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.
- खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल स्वस्त होणार आहेत.
- शेती चे साहित्य
कापड आणि कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क दरांचा आकडा 21% वरून 13% पर्यंत करण्यात आला आहे. रिणामी, खेळणी, सायकल, वाहनांसह काही वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क, उपकर आणि अधिभार यामध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढली आहे.