Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता. निवडणुकीचे वर्ष असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प होता. असं असतानाही या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. साधारणपणे, कोणत्याही बजेटनंतर अनेकांना काय महाग झालं आणि काय स्वस्त झालं याबाबत माहिती जाणून घ्यायची असते. अर्थमंत्री सीतारामन यांच्या सुमारे तासाभराच्या अर्थसंकल्पीय भाषणानंतर तुम्हीही जर याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
काही महागलं नाही आणि स्वस्तही झालं नाही
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी, महिला आणि पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, असं असूनही अंतरिम अर्थसंकल्पानंतर काहीही महाग किंवा स्वस्त झालेलं नाही. होय, या अर्थसंकल्पात अशा कोणत्याही घोषणा नाहीत ज्यामुळे देशात कोणतीही वस्तू महाग होईल किंवा स्वस्त होईल.
का झालं असं ?
१ जुलै २०१७ रोजी वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाल्यानंतर, बजेटमध्ये काहीही महाग किंवा स्वस्त हे केवळ कस्टम ड्युटी किंवा एक्साईज ड्युटीमधील कोणत्याही बदलामुळे होते. या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी एक्साईज ड्युटी किंवा कस्टम ड्युटीवर काहीही घोषणा केलेली नाही. यामुळे कोणतीही गोष्ट थेट महाग किंवा स्वस्त होणार नाही.