Budget 2024 Date and Time: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अवघ्या दोन दिवसांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे, हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी येत आहे. दरम्यान, अर्थसंकल्प कधी सादर होणार, किती वाजता होणार, अर्थसंकल्पीय भाषण लाइव्ह कुठे बघायला मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2024 चा अर्थसंकल्प कधी येणार?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत हा पूर्ण अर्थसंकल्प नसेल. ही तात्पुरती आर्थिक योजना किंवा 'व्होट ऑन अकाउंट' असेल. दरवर्षी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळीही अर्थसंकल्पासाठी हाच दिवस निश्चित करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाचे वाचन किती वाजता सुरू होणार?
अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ साधारणत: सकाळी 11 वाजता असते. त्याचवेळेवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प लोकसभेत मांडतील. यंदाचा अर्थसंकल्प विशेष आहे. त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच तो सादर केला जाणार आहे. अशा स्थितीत सर्वांचे लक्ष याकडे असेल.
केंद्रीय अर्थसंकल्प कुठे बघायला मिळणार?
तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्प लाईव्ह पाहू शकाल.
- दूरदर्शन
- संसद टीव्ही
- अर्थ मंत्रालयाचे YouTube चॅनेल
- विविध वृत्तवाहिन्या