Join us

Budget 2024 : ३.४ टक्क्यांनी वाढलं डिफेन्स बजेट, Deep-Tech वर लक्ष; कशी वाढेल देशाची ताकद?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:52 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली.

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी संरक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. संरक्षण क्षेत्रात नवी डीप टेक टेक्नॉलॉजी आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आत्मनिर्भर होण्यावर भर देण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या. पण डीप टेक टेक्नॉलॉजी काय आहे हा प्रश्न आहे. डीप टेक टेक्नॉलॉजी म्हणजे बायोटेक, क्वांटम, कम्प्युटिंग, एआय, रोबोटिक्स,अॅडव्हान्स्ड मटेरियल, ग्रीन एनर्जी, अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग आणि एअरोस्पेसारखे उद्योग. 

म्हणजेच संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत आता खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही संधी मिळेल. कारण हे तंत्रज्ञान देशाच्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे. या सर्व बाबी वैज्ञानिक प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील ताकद अधिक वाढणार आहे.  

यासोबतच सरकारनं आत्मनिर्भरवरही भर दिलाय. देशाच्या सुरक्षेसाठी लागणारी हत्यारं, तंत्रज्ञान सर्वकाही देशातच बनावी आणि जास्तीत जास्त निर्यात केली जावी अशी सरकारची इच्छा आहे. गेल्या वर्षी देशाचं संरक्षण उत्पादन १ लाख कोटी झालंय. आता अर्थसंकल्पातील ही घोषणा महत्त्वाची असणार आहे.  

३.४ टक्क्यांनी वाढलं डिफेन्स बजेट 

संरक्षण क्षेत्रात ५१.३७ लाख जवान आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाची घोषणा केली. परंतु सविस्तर माहितीसाठी सरकार स्थापन झाल्यानंतर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत थांबावं लागणार आहे. २०२३-२४ मध्ये डिफेन्स बजेट ६.०२ लाख कोटी रुपये होतं. यापूर्वीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १३ टक्के अधिक होतं. यावेळी ते वाढवून ६.२० लाख कोटी करण्यात आलंय. यामध्ये ३.४ टक्क्यांची वाढ करण्यात आलीये.

टॅग्स :अर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019बजेट क्षेत्र विश्लेषण