Join us

Budget 2024: अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना अधिक अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 11:54 AM

Budget 2024: कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये संकल्पांची आशा उंचावणारी ‘पेरणी’ केली आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या यापेक्षा अधिक अपेक्षा आहेत हे नक्की !

- डॉ. बुधाजीराव मुळीक ( कृषीतज्ज्ञ)खरं   तर हा ‘अंतरिम अर्थसंकल्प’ आहे, त्यामुळे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून फार मोठी अपेक्षा नव्हतीच. ‘तेलबियांमध्ये आत्मनिर्भरता’ हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय. त्यावर विशेष भर देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. अधिक उत्पादन देणाऱ्या नव्या प्रजातींच्या संशोधनालाही प्राधान्य दिले जाणार आहे, ही चांगली घोषणा आहे.   ‘नॅनो युरिया’चा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरल्याने हुरूप वाढलेल्या सरकारने ‘नॅनो डीएपी’च्या विस्ताराची घोषणा केली आहे. नॅनो डीएपीमुळे पिकांची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढेल. दुग्ध उत्पादकांना बळ देण्यासाठीच्या सर्वंकष योजनेमुळे भविष्यात राष्ट्रीय गोकुळ योजनेला नवे बाळसे आलेले दिसेल. मत्स्यशेतीला बळ, किसान सन्मान निधीसाठी कायम ठेवलेली तरतूद, शेतीसाठी वाढविलेली तरतूद, भावी दिशा स्पष्ट करणारा आत्मविश्वासपूर्ण अंदाज आदी अनेक जमेच्या बाजू अर्थसंकल्पात आहेत.    परंतु ‘एफपीओ’ (शेतकरी उत्पादक संघटना) साठीची घसरलेली तरतूद आदी उणे बाजू दिसतात. खतांसाठीचे अनुदान कमी केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.  कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये संकल्पांची आशा उंचावणारी ‘पेरणी’ केली आहे. तरीदेखील शेतकऱ्यांच्या यापेक्षा अधिक अपेक्षा आहेत हे नक्की !

टॅग्स :अर्थसंकल्प 2024शेती क्षेत्रबजेट तज्ञांचा सल्ला