Lokmat Money > बिझनेस न्यूज > पायाभूत सुविधांपासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत...अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

पायाभूत सुविधांपासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत...अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 05:31 PM2024-01-28T17:31:50+5:302024-01-28T17:32:34+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

Budget 2024: From infrastructure to defence and railways...big expectations from the budget | पायाभूत सुविधांपासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत...अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

पायाभूत सुविधांपासून ते संरक्षण आणि रेल्वेपर्यंत...अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांचे यावर विशेष लक्ष असेल. या अर्थसंकल्पात सरकार पायाभूत सुविधा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर देणार असल्याचा अंदाज विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पायाभूत विकासावर भर द्यावा
AUM कॅपिटलचे नॅशनल हेड ऑफ वेल्थ मुकेश कोचर म्हणतात की, 'आम्ही आशा करतो की, पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित करुन ‘मेक इन इंडिया’ केंद्रीत सरकारी धोरणे सुरू ठेवली जातील. रेल्वे आणि संरक्षणासाठी जास्त वाटप अपेक्षित असून, बाजारही याकडे अतिशय उत्सुकतेने पाहत आहे. हा मतदानपूर्व अर्थसंकल्प असल्याने शेतकरी आणि ग्रामीण लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल काही घोषणांची अपेक्षा आहे. अक्षय ऊर्जा संदर्भात नवीन घोषणा शक्य आहे. एकूणच आम्ही अर्थसंकल्पाबाबत खूप सकारात्मक आहोत, असं ते म्हणाले.

वित्तीय तूट कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा
मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​संचालक गुरुमीत सिंग चावला म्हणतात की, या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सरकार कल्याणकारी खर्चात वाढ करेल आणि वित्तीय तूट FY2026 पर्यंत GDP च्या 4.5% पर्यंत कमी करण्याचे संभाव्य उद्दिष्ट ठेवेल. कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी कर सवलतीच्या उपायांसह इतर घोषणा असू शकतात. ग्रीन हायड्रोजन, ईव्ही आणि ब्रॉडबँडच्या विकासावरही लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे, असं ते माहणाले.

 

Web Title: Budget 2024: From infrastructure to defence and railways...big expectations from the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.