Join us

Budget 2024 : विद्यार्थी, तरुण, महिला अन् शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी! निर्मला सीतारमन यांच्या 16 महत्वाच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:31 PM

या अर्थसंकल्पात सितारमन यांनी विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला वर्ग, एक्सप्रेसवे तसेच मोफत राशन व्यवस्था अशा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर झाला. अर्थमंत्री मंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सलग 7व्यांदा संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सितारमन यांनी विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला वर्ग, एक्सप्रेसवे तसेच मोफत राशन व्यवस्था अशा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

या आहेत निर्मला सीतारमण यांच्या महत्वाच्या घोषणा -- 5 वर्षांसाठी मोफत राशन व्यवस्था सुरूच राहील.- या वर्षात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद.- रोजगार निर्मितीसाठी 3 योजनांवर काम करणार सरकार.- विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल लोन.- पहल्यांदा नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त PF.- नोकऱ्या अथवा कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिले जाणार. - वसतिगृहे बांधण्यासाठी आणि महिलांसाठी विशेष कौशल्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी भागीदारी करून काम केले जाईल.- पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना दो वर्षांपर्यंत महिन्याला 300 रुपये अतिरिक्त पीएफ देणार सरकार.- स्थानिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार.- युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. 30 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळणार. 

Capital Gains Tax: बजेटनंतर का गडगडला बाजार? ज्याची भीती होती, तीच घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली, अन्...

- सरकार येत्या 5 वर्षांत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार आहे. एका वर्षाच्या इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक महिन्याला 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.- बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा.- बोधगया-वैशाली एक्सप्रेसवे तयार करणार.- पाटणा-पूर्णिया एक्सप्रेसवे तयार करणार.- बक्सरमध्ये गंगा नदीवर दोन लेनचा पूल तयार करणार.- बिहारमध्ये एक्सप्रेसवेसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद.

बजेट 2024 मध्ये ऑटो सेक्टरसाठी मोठी घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी होणार

मुद्रा योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा ₹१० लाख वरून ₹२० लाखांवर-आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना व्यवसाय उभारणीत मदत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने मुद्रा योजनेंतर्गत खास कर्जाची व्यवस्था करुन ठेवली आहे. रस्त्यावर फळे-भाज्या विकणे असो अथवा इतर कुठलाही लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकार कोणत्याही गॅरंटीशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत होते. या कर्जाची मर्यादा आता २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा सितारमण यांनी केली आहे.

टॅग्स :निर्मला सीतारामनअर्थसंकल्प 2024भाजपामहिलाकर्मचारीनोकरीविद्यार्थी