लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मालमत्ता विक्रीनंतर हाेणाऱ्या भांडवली लाभावरील (कॅपिटल गेन) इंडेक्सेशनचा लाभ आता रद्द करण्यात आला आहे. मात्र, ज्या लाेकांनी २००१पूर्वी घर किंवा रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी केली आहे, त्यांना महागाई समायाेजनासाठी इंडेक्सेशनचा लाभ मिळणार आहे. अशा लाेकांना दिर्घकालीन भांडवली लाभ करदेखील कमी द्यावा लागणार आहे. मात्र, त्यानंतर घर खरेदी करणाऱ्याना आता हा फायदा मिळणार नाही. एकीकडे सर्वसामान्यांमध्ये यासंदर्भात संभ्रमाची स्थिती आहे, तर दुसरीकडे सरकारने मात्र लाेकांची करबचत हाेईल, असा दावा केला आहे. या नव्या नियमाचा काेणाला फायदा हाेणार काणी काेणाला नुकसान, जाणून घेऊ या...
दीर्घकालीन अवधीत लाभ?
केंद्रीय सचिव संजय मलहाेत्रा यांनी सांगितले की, इंडेक्सेशन हटवल्यासाेबतच कॅपिटल गेन टॅक्सचा दर घटविण्यात आला आहे. याचा दिर्घकाळासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा हाेईल.
इंडेक्सेशन म्हणजे काय?
- इंडेक्सेशन म्हणजे काय, हे जाणून घेऊ या. घर खरेदी केले ते वर्ष आणि विकले ते वर्ष, या कालावधीत महागाई समायाेजन करण्यासाठी इंडेक्सेशनचा वापर केला जाताे.
- यासाठी ‘काॅस्ट इंन्फ्लेशन इंडेक्स’चा (सीआयआय) आधार घेतला जाताे. हा इंडेक्स दरवर्षी बदलताे. मालमत्तेची दुरूस्ती, काही सुधारणा इत्यादी खर्च विक्री मुल्यातून कमी करण्यात येताे. इंडेक्सेशनमुळे दिर्घकालीन भांडवली लाभ कर बराच कमी हाेताे.
नव्या व्यवस्थेत काेणाला फायदा हाेणार?
- पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवलेल्या घराची किंमत १.७ पटीने वाढते, तेव्हाच नवी व्यवस्था फायदेशीर ठरेल.
- १० वर्षांपर्यंत ठेवलेल्या घराची किंमत २.४ पट वाढेल, तरच नव्या नियमांचा फायदा हाेऊ शकताे.
-२००९-१०मध्ये खरेदी केलेल्या संपत्तीचे मूल्य ४.९ पट वाढले, तरच नवी व्यवस्था फायदेशीर ठरू शकते.
यांना हाेऊ शकताे ताेटा
ज्या भागात मालमत्तेची किंमत वाढीचा दर कमी आहे, म्हणजे, साधारणत: ९-११ टक्के एवढी वाढ दरवर्षी हाेत आहे, अशा लाेकांना फार फायद हाेणार नाही. इंडेक्सेशन संपल्यामुळे या लाेकांना जास्त कर द्यावा लागेल. इंडेक्सेशन नसल्यामुळे या करदात्यांवर माेठा पिरणाम हाेईल, असे डेलाॅईट इंडियाच्या तज्ज्ञांचे मत आहे.
इंडेक्सेशनचा लाभ हटविल्यामुळे काय हाेणार?
सरकारने इंडेक्सेशनचा लाभ हटविला आहे. त्यामुळे तुम्ही घर विकले तर लाॅंग टर्म कॅपिटल गेन अर्थात दिर्घकालीन भांडवली लाभ कराची आकडेमाेड करताना महागाईचा दावा करता येणार नाही. त्यामुळे जास्त कर द्यावा लागेल. भांडवली लाभ हा घराच्या प्रत्यक्ष विक्री मुल्यावर गणला जाईल. ४-५ टक्के इंडेक्सेशन महागाई समायाेजनासाठी गृहित धरले जाते. ते नव्या नियमानुसार गृहित धरले जाणार नाही. त्यामुळे जास्त कर द्यावा लागू शकताे, असे तज्ज्ञ म्हणतात.