Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024: भारतीय रेल्वेला मिळू शकतात ३ लाख कोटी; प्रवासी सुविधांवर असेल अधिक भर

Budget 2024: भारतीय रेल्वेला मिळू शकतात ३ लाख कोटी; प्रवासी सुविधांवर असेल अधिक भर

Budget 2024: वंदे भारतची संख्या वाढवणे, स्लीपर वंदे भारतचे लोकार्पण यासह प्रवाशांच्या सोयी-सुविधा अद्ययावर करण्याचा कल अर्थसंकल्पात पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:57 PM2024-01-30T16:57:09+5:302024-01-30T16:57:17+5:30

Budget 2024: वंदे भारतची संख्या वाढवणे, स्लीपर वंदे भारतचे लोकार्पण यासह प्रवाशांच्या सोयी-सुविधा अद्ययावर करण्याचा कल अर्थसंकल्पात पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

budget 2024 indian railway could get 3 lakh crore new vande bharat trains roll outs and wifi can be available in trains | Budget 2024: भारतीय रेल्वेला मिळू शकतात ३ लाख कोटी; प्रवासी सुविधांवर असेल अधिक भर

Budget 2024: भारतीय रेल्वेला मिळू शकतात ३ लाख कोटी; प्रवासी सुविधांवर असेल अधिक भर

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेश लवकरच सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पातून देशाला काय मिळेल, याची उत्सुकताही लागून राहिली आहे. भारतीय रेल्वेसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते, असा कयास आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने रेल्वेवर विशेष लक्ष केंद्रित करू शकते. केंद्र सरकार यावेळी रेल्वे बजेटमधील तरतूद वाढवू शकते. भारतीय रेल्वेसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण तसेच विद्यमान वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवणे, प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करणे, यावर केंद्र सरकारचा भर असू शकतो. गत अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 

प्रवाशांची सुविधा, दुपदरीकरण आणि विद्युतीकरणावर भर

सन २०२४ च्या अर्थसंकल्पतील मोठा हिस्सा प्रवाशांच्या सुविधा अद्ययावत करण्यासाठी खर्च केला जाऊ शकतो. निवडणुकीचे वर्ष असल्याने देशातील प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यावर केंद्र सरकारचा मुख्य भर असेल. या अर्थसंकल्पात सरकारचा भर विद्युतीकरण आणि दुपदरीकरण यावर असेल. यावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाऊ शकते. 

दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पात भारतीय रेल्वे वंदे भारत ट्रेनच्या यशस्वी रोलआउटवर लक्ष केंद्रित करेल. पुढील तीन वर्षांत ४०० वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य भारतीय रेल्वेचे आहे. अर्थसंकल्पात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचीही घोषणा होऊ शकते. रेल्वे स्थानकांवर खाजगी सहभाग वाढवून सौर पॅनेल बसवण्याची मान्यता दिली जाऊ शकते. ट्रेनमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच खान-पान सेवा आणखी चांगली कशी होऊ शकेल, यावरही विचार होऊ शकतो. यासह पीपीपी मॉडेलद्वारे महसूल वाढविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
 

Web Title: budget 2024 indian railway could get 3 lakh crore new vande bharat trains roll outs and wifi can be available in trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.